राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सोलापूर, दि. 05 (जिमाका) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2022-23 मध्ये एनएफएसएम टीएमयू 370 कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृषक भवन सोलापूर येथे संपन्न झाली.

                कार्यशाळेस विभागीय संशोधन केंद्राचे डॉ. विजयकुमार अमृतसागर, सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, तंत्र सल्लागार, तंत्र सहायक व तुर व उडीद उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

                कार्यशाळेस विभागीय संशोधन केंद्राचे सहयोगी प्राध्यापक व्ही. टी. जाधव यांनी तुर पिकाविषयी लागवडीपासून ते काढणीपर्यंत उत्पादन वाढीवर मार्गदर्शन केले.  मोहोळ कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक दिनेश क्षीरसागर यांनी कडधान्य पिकाचे प्रक्रीया उद्योग स्थापन करणे याविषयी तर सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे यांनी तुर उत्पादन वाढीमध्ये शेंडा खुडणे याविषयी मार्गदर्शन केले.

                कार्यशाळेचे सुत्र संचलन तालुका कृषी अधिकारी मनिषा माळी यांनी केले.  उपविभागीय कृषी अधिकारी जे. जी. कवडे यांनी आभारप्रदर्शन केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here