युटोपियन शुगर्स च्या गळीत हंगाम २०२१-२२ मधील पहिल्या ५ साखर पोत्यांचे पूजन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

युटोपियन शुगर्स लि.पंतनगर कचरेवाडी या कारखान्याच्या आठव्या गळीत हंगाम २०२१-२०२२ मधील पहिल्या पाच साखर पोत्यांचे पूजन सोमवार दि.२५/१०/२०२१ रोजी कारखान्यातील हमाल संतोष विठ्ठल जाधव व कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक आणी कारखान्याचे चीफ केमिस्ट चंद्रकांत विभूते यांच्या शुभ-हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांचे सह कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख अधिकारी,व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
       
यावेळी बोलताना चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,कारखान्याचा हा आठवा गळीत हंगाम आहे,कारखाना चालू वर्षी पूर्ण क्षमतेने विनाअडथळा गाळप करत असून चालू वर्षी कारखान्याच्या शेती विभागाने  करार केलेले सर्व ऊस तोडणी व वाहतुक ठेकेदार यांनी ऊस तोडणीस सुरुवात केल्याने व कारखान्याचा यांत्रिक विभाग सजग असल्याने  कारखान्याचे गाळप पूर्ण क्षमतेने चालू आहे.त्यामुळे कारखाना आपले अपेक्षित उद्दिष्ठ निश्चित पणाने पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करीत याकामी सर्व ऊस उत्पादक व कामगार यांनी योग्य ते सहकार्य करावे असा आवाहन ही परिचारक यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here