मा. आ.प्रशांत परिचारकांचा पुन्हा पुन्हा एकदा बाजार समितीवर कब्जा (पंढरपूर बाजार समितीच्या सर्व १८ जागांवर दणदणीत विजय)

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार प्रशांत परिचारक गटाने एकहाती वर्चस्व मिळविले आहे. बाजार समितीच्या१८ पैकी १८ जागा परिचारक गटाने मिळविल्या आहेत. अठरापैकी पाच जागा परिचारक गटाच्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरीत १३ जागांवरही निवडणुकीत जिंकल्या आहेत.

परिचारक यांना बाजार समितीच्या निवडणुकीत विठ्ठल परिवारातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे आणि भगीरथ भालके यांची साथ मिळाली होती. काळे-भालकेंच्या साथीने परिचारक यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या पॅनेलचा दणदणीत पराभव केला आहे. या निवडणुकीत विठ्ठल परिवारातील नेत्यांमध्ये फूट पडली होती. आमदारकीसाठी इच्छूक असलेल्या पाटील यांच्या पॅनेलला प्रथमच हार पत्कारावी लागली आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक गटाने पंढरपूर बाजार समितीवर आपली सत्ता कायम राखली आहे. त्यांनी या निवडणुकीत विरोधी अभिजित पाटील गटाचा दारूण पराभव‌ केला आहे. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलाची उधळण करत जल्लोष साजरा केला. पंढरपूर बाजार समितीवर परिचारक गटाची गेल्या २५ वर्षांपासून सत्ता आहे. ती परिचारक यांनी याही निवडणुकीत कायम राखली आहे.

दरम्यान, प्रशांत परिचारक गटाचे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. सहकारी संस्था इतर मागास प्रवर्ग, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती आणि व्यापारी मतदारसंघातील दोघांचा त्यामध्ये समावेश आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here