मका पिकावरील नवीन लष्करी अळीचे व्यसस्थापन

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मका पिकावरील नवीन लष्करी अळीचे व्यसस्थापन

सोलापूर,दि.7: सद्यस्थितीत विदर्भातील मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव येत आहे. विशेषता: अकोला वाशिम व चंद्रपुर जिल्ह्यातील काही गावात या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.असाच प्रादुर्भाव इतरत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या किडीच्या नुकसानीचा प्रकार व व्यवस्थापनाबाबतच्या महत्वाची बाबी खालीलप्रमाणे कृषि संचालक (विस्तार व परिक्षण) विकास पाटील यांनी सांगितल्या आहेत.

नुकसान: अळया पाने खाऊन पिकाचे नुकसान करतात. नुकत्याचा अंड्यातून बाहेर आलेल्या अळया पानाचा हिरवा पापुद्रा खातात. त्यामुळे पानाला पांढरे चट्टे पडतात. दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळ्या छिद्रे करतात. पानाच्या कडा खातात. अळ्या मक्याच्या पोंग्यामध्ये राहून पानाला छिद्रे करतात. त्यामुळे र्पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेषेत एकसमान छिद्रे दिसतात. सर्वसाधारण एका झाडावर एक किंवा दोन अळ्या राहतात, कारण त्या जवळ आल्यास एकमेंकाना खातात. जुनी पाने मोठ्या प्रमाणात पर्णहीन होऊ पानाच्या फक्त शिरा झाडाचे मुख्य खोड शिल्लक राहते. झाड फाटल्यासारखे दिसते. पोंगा धरण्याची सुरुवातीची अवस्था प्रादुर्भावास कमी बळी पडते, मध्यम पोंगे अवस्था त्यापेक्षा जास्त पोंगे अवस्था अळीला सर्वात जास्त बळी पडते. अळी काही वेळा कणसाच्या बाजूने आवरणाला छिद्र करु दाणे खाते. दिवसा अळी पोंग्यात लपून राहते. या किडीचे व्यस्थापनाचे उपाय खालीलप्रमाणे आहेत.

व्यवस्थापन

पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत एकरी 20 या प्रमाणे पक्षी थांबे उभारावे, पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पानावरील समूहात दिलेली अंडी किंवा अळयांचा समूह असलेली प्रादुर्भाव ग्रस्त पने पांढरे चट्टे असलेली अंडी अळ्यांसहित नष्ट करावी,प्रादूर्भाव दिसताच प्रादूर्भावग्रस्त पोंग्यामध्ये सुकलेली वाळू टाकावी, पतंग मोठ्या प्रमाणावर नष्ठ करण्यासाठी कामगंध सापाळ्यांचा एकरी15 या प्रमाणे वापर करावा. सापळे पिकाच्या घेराच्या उंचीबरोबर प्राधान्याने सुरुवातीच्या पोंगे अवस्थेत लावावे, सुरुवातीस पानातील हरित लवक खाऊन पानावर पांढरे, लाबंट चट्टे/रेषा किंवा ठिपके दिसताच बॅसिलस थुरिंजीनिसस व कुर्सटाकी 20 ग्रॅम/10ली पाणी किंवा 400 ग्रॅम/एकर जैविक कीटकनाशकांची 5 टक्के प्रादुर्भाव असल्यास,5 टक्के निंबोळी अर्क किंवा अझॅडीरेक्टिन 1500 पीपीएम,50 मिलि प्रती 10 लीटर याप्रमाणे फवारणे, रोपे ते सुरुवातीची पोंगे अवस्था उगवणी नंतर 3 ते 4 आठवड्यांनी 5टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळल्यास फवारणी करावी. मध्यम ते उशिरा पोंगे अवस्था उगवणी नंतर 5 ते 7 आठवड्यांनी मध्यम पोंगे अवस्थेमध्ये 10 टक्के पोंग्यामध्ये प्रादुर्भाव तर उशिरा पोंगे अवस्थेमध्ये 20 टक्के पोंग्यामध्ये प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी. गोंडा ते रेशीम अवस्था उगवणी नंतर 8 आठवड्यांनी फवारणीची गरज नाही परंतु 10 टक्के कणसामध्ये प्रादुर्भाव आढळल्यास फवारणी करावी, चाऱ्यासाठी घेतलेल्या मका पिकावर कुठल्याही प्रकारच्या रासयनिक कीटकनाशकाची फवारणी करु नये त्याएवजी जैविक कीठकनाशकाचा वापर करावा.

कीटकनाशकाची नावे

क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल 9.3 टक्के प्रवाही + लॅमडा सायलोथ्रीन 4.6 टक्के झेडसी प्रवाही किंवा 5मिली-मात्रा/10लिटर पाणी, स्पीनोटेराम 11.7 टक्के एससी प्रवाही किंवा 5.12 मिली- मात्रा/10लिटर पाणी, क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल 18.5 टक्के प्रवाही एससी किंवा 4.32 मिली- मात्रा/10लिटर पाणी, इमामेक्टिन बेंजाएट 5 टक्के+ल्युफेनूरॉन 40 टक्के डब्ल्यूजी किंवा 1.6 ग्रॅम- मात्रा/10लिटर पाणी,, थायोडीकार्ब 75 डबल्यू.पी किंवा 20 ग्रॅम– मात्रा/10लिटर पाणी, इमामेक्टिन बेंजाएट 5 टक्के एसजी किंवा 8 ग्रॅम- मात्रा/10लिटर पाणी, नोवलुरोन 5.25 + , इमामेक्टिन बेंजाएट 0.9 प्रवाही एससी 30 मिलि- मात्रा/10लिटर पाणी.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here