मंगळवेढा येथे जप्त वाळू साठ्याचा लिलाव

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

मंगळवेढा येथे जप्त वाळू साठ्याचा लिलाव

 

पंढरपूर (दि.१३):- मंगळवेढा उप विभागातील कार्यक्षेत्रात जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव दिनांक २० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.

            मंगळवेढा उपविभागातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर केलेल्या कारवाईत मंगळवेढा तालुक्यातील   मौजे सिद्धापूर ६१० ब्रास शासकीय किंमत सुमारे २२ लाख ५७ हजार ७४० , मौजे ढवळस येथील गट नंबर ९८, १०९/१/अ/,१९०/१अ, प्रत्येकी ५०० ब्रास प्रमाणे एकूण १५०० ब्रास, शासकीय किंमत ५५ लाख ५० हजार, मंगळवेढा पोलीस ठाणे आवारातील २८.०५ ब्रास शासकीय किंमत १ लाख ३ हजार ७८५ आहे.

 तर सांगोला तालुक्यातील शासकीय धान्य गोदाम आवारातील १३० ब्रास, शासकीय किंमत ४ लाख ८१ हजार व सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील १७  ब्रास , शासकीय किंमत ६२ हजार ९००  इतकी आहे.  ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावयाचा आहे. अशा व्यक्तींनी संबंधित ठिकाणच्या वाळू  साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा उपविभाग मंगळवेढा येथे सादर करावेत, असेही उपविभागीय अधिकारी भोसले यांनी सांगितले.

 सदर लिलावात भाग घेण्यासाठी २५ टक्के रक्कम रोख अथवा  डी . डी.द्वारे भरावी त्याचबरोबर अर्जाचे शुल्क रुपये दोन हजार विनापरतावा भरणे आवश्यक आहे. तसेच सर्वोत्तम बोलीची २५ टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाद्वारे जमा करावी. बोलीची उर्वरित ७५ टक्के रक्कम शासकीय खजिन्यात सात दिवसाच्या आत भरल्यानंतर स्वतःकडील वाहनाद्वारे संबंधित ठिकाणावरून वाळू घेऊन जावा. लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. तसेच नमूद ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे असे आव्हानही उपविभागीय अधिकारी श्री .भोसले यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here