भोसे येथे शेतकरी मेळावा व अॅड. गणेश पाटील यांचा नागरी आज जंगी सत्कार समारंभ

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सायंकाळी ६ वाजता शेतकरी मेळावा आयोजित करण्यात असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत तुकाराम महाराज यांचे विद्यमान वंशज बाळासाहेब देहूकर आहेत.

तसेच या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, सोलापूर जिल्हा युवक निरीक्षक शरद लाड सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे, विठ्ठल सह. साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, युवराज पाटील, अॅड. दीपक पवार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here