फॅबटेकच्या विजय कुमार चौगुले  या  विद्यार्थ्यांची ट्रान्सफॉर्म को  या नामांकित कंपनी मध्ये निवड

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

फॅबटेकच्या विजय कुमार चौगुले  या  विद्यार्थ्यांची ट्रान्सफॉर्म को  या नामांकित कंपनी मध्ये निवड

सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या कॉम्पुटर इंजिनिअरिंग विभागातील विजय कुमार चौगुले  या  विद्यार्थ्यांची ट्रान्सफॉर्म को या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.
ट्रान्सफॉर्म को हि अमेरिकन बेस असलेली आय टी  कंपनी असून या कंपनीचे वार्षिक पॅकेज  ४ लाख आहे तसेच फॅबटेक  कॉलेजने मुलांना क्यू  स्पायडर ट्रेनिंग  इन्स्टिटयूट मार्फत ट्रेनिंग देत असल्यामुळे फॅबटेक मधील विद्यार्थी जागतिक स्पर्ध्येमध्ये टिकाव धरत असल्याची माहिती प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर यांनी दिली..
       फॅबटेक  अभियांत्रिकी  महाविद्यालय या कोविड – परिस्थितीत विद्यार्थ्यांना अव्वल कंपन्यांमध्ये स्थान देण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहे. आतापर्यंत असे अनेक निवड झालेले विद्यार्थी  खऱ्या अर्थाने  फॅबटेक कॉलेजचे  नाव  मोठे करत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग  डायरेक्टर  मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी सांगितले.
    निवड झालेल्या या  विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. अमित रुपनर , श्री  दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, कॉम्प्युटर  इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. पराग दौंडे  व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा  संगनगौडर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here