प्रथम वर्ष डिप्लोमा  मधील विद्यार्थ्यांचे  फॅबटेक  मध्ये  उत्साहात स्वागत

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

सांगोला : ज्ञान   प्राप्तीला  कौशल्याची  जोड दिल्याने अभियंते सन्मानास
पात्र होतील असे प्रतिपादन सेवा निवृत्त शिक्षक श्री महादेव घोंगडे
यांनी  केले .

 सांगोला येथील  फॅबटेक  पॉलीटेक्नीक कॉलेजने आयोजित केलेल्या प्रथम वर्ष
डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे
म्हणून ते बोलत होते . या वेळी व्यासपीठावर एक्सिक्युटीव्ह डायरेक्टर
दिनेश रुपनर , कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे, पॉलीटेक्नीकचे प्राचार्य
प्रा. शरद पवार, प्रथम वर्ष विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अनिल वाघमोडे
आदी  उपस्थित होते .

पुढे बोलताना श्री घोंगडे म्हणाले कि विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षण
घेण्या ऐवजी   तंत्र शिक्षणाची कास धरून कौशल्य प्राप्ती केल्यास
बेरोजगारीचे प्रमाण कमी होण्यास  निश्चित  मदत होईल .

कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे यांनी तंत्रशिक्षण शाखेत प्रवेश घेतल्यबद्दल
 विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.प्राचार्य शरद पवार यांनी मनोगत व्यक्त
करताना फॅबटेक पॉलीटेक्नीक मध्ये प्रवेश घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांचे
अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा  दिल्या . प्रथम वर्ष विभाग प्रमुख
प्रा . अनिल वाघमोडे यांनी महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या
उपक्रमाची माहिती दिली. उपक्रमातील रात्र अभ्यासिका,प्राणायाम, इंग्रजी
शब्द संग्रह वाढीसाठी घेण्यात येत असलेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी
सहभाग घेण्याचे आवाहन केले.

प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले. या
कार्यक्रमात प्रत्येक शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व आझादी का अमृत
महोत्सवानिमित्त स्वच्छता अभियान कार्यक्रमात तसेच विविध स्पर्ध्येमध्ये
सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांचे हि अभिनंदन करण्यात आले. सदर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा . वैशाली मिस्कीन यांनी
केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here