पंतप्रधान मोदींचा आज देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद, महाराष्ट्रातून नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

मुंबई : केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार संवाद आहेत. आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान संवाद साधतील. महाराष्ट्रातून नंदुरबारचे जिल्हाधिकारी या संवादावेळी उपस्थित  राहणार आहेत. त्याबरोबरच प्रेटोकॉल म्हणून सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित राहणार आहेत. 

पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “नरेंद्र मोदी जिल्ह्यातील सरकारी योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची प्रगती आणि सद्यस्थिती याबद्दल जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतील. त्यामुळे या संवादातून सरकारी योजनांची सद्यस्थिती कळेल. याबरोबरच या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून हे देखील समोर येईल की जिल्ह्यांमध्ये सध्या कोणत्या समस्या आहेत.”केंद्राच्या विविध योजना लवकरात लवकर जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचा या संवादाचा उद्देश आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ”पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने देशभरातील विकास आणि विकास कामांमध्ये येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी सातत्याने पावले उचलली आहेत. देशभरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि सर्वांसाठी सर्वसमावेशक विकासासाठी सरकार वचनबद्ध आहे”

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here