दामाजी कारखान्याची भंगार विक्री पारदर्शक असलेबाबत चौकशी अधिकारी यांचा अहवाल -मा. श्री. राजेंद्र सुरवसे-संचालक

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापनाने सहा वर्षाचे कालावधीत तीन वेळा केलेली विक्री ही पारदर्शक असुन मा।साखर आयुक्त यांचे मंजुरीने, विशेष लेखा परिक्षक यांचे अध्यक्षतेखाली ई-आॅक्शनद्वारे विक्री रितसर केली असुन शासकिय व्हॅल्युएटरचे किमतीपेक्षा जास्त किमतीला विक्री केले असुन सदर विक्रीच्या रक्कमा चेक/आरटीजीएस/एनईएफटीद्वारे कारखान्याचे खात्यावर जमा असलेचा अहवाल चौकशी अधिकारी श्री।गौतम निकाळजे यांनी दिला असलेची माहिती कारखान्याचे संचालक श्री। राजेंद्र सुरवसे यांनी आमचे प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली।
दामाजी कारखान्याचा २० कोटी किमतीचा भंगार माल साखर आयुक्त यांची मंजुरी न घेता मर्जीतील ठेकेदाराला केवळ ६ कोटीला बेकायदेशिर विक्री केला असुन त्याची रक्कम हडप केली असलेबाबत आरोप करुन चौकशी करणेबाबत कारखान्याचे सभासद श्री प्रकाश भिवाजी पाटील,मारापुर यांनी मा।प्रादेशिक सहसंचालक,सोलापुर यांचेकडे चौकशी करणेबाबत तक्रारी अर्ज दाखल केला होता। अर्जास अनुसरुन मा।प्रादेशिक सहसंचालक,सोलापुर यांनी चौकशी अधिकारी म्हणुन श्री।गौतम निकाळजे, विशेष लेखा परिक्षक वर्ग-१ सहकारी संस्था यांची नियुक्ती केली होती। चौकशी अधिकारी श्री निकाळजे यांनी चौकशी करुन अहवाल सादर केला आहे। यामध्ये त्यानी कारखान्याने सर्व शासकिय नियमाचे पालन करुन, शासकिय व्हॅल्युएटर कडुन भंगार मालाची किंमत निश्चीत करुन, श्री।एस।व्ही। कोल्हापुरे विशेष लेखा परिक्षक यांचे अध्यक्षतेखाली ई-आॅक्शनद्वारे निरुपयोगी भंगार माल रितसर विक्री केला असलेचे नमुद केले आहे। शासकिय व्हॅल्युएटर यांनी केलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने भंगार माल विक्री केलेची माहिती खालीलप्रमाणे कारखान्याच्या आॅफीसमध्ये केंव्हाही पाहण्यास उपलब्ध आहे। यावरुन विक्रीतील पारदर्शकता दिसुन येते। १। सन २०१८-१९ मध्ये व्हॅल्युएटरने ठरविलेली किंमत रु।३२,३३,०००/- असलेले. १,३६,६५,१४५/- किमतीला  ई-आॅक्शनद्वारे विक्री केलेले आहे। सदर विक्रीतुन रु १,०४,३२,१४५/- जास्तीची किंमत आलेली आहे। २। सन २०१९-२० मध्ये व्हॅल्युएटरने ठरविलेली २५ लाॅटची किंमत रु।७३,०२,७५०/- असताना त्यातील १३ रु।७४,०४,५२८/- किमतीला ई-आॅक्शनद्वारे विक्री केलेले आहे। व १२ लाॅट स्थगित ठेवण्यात आलेले आहेत।  १२ लाॅट स्थगित ठेवुनही रु।१,०१,७७८/- जास्त किंमत आलेली आहे। ३। सन २०२०-२१ मध्ये व्हॅल्युएटरने ठरविलेली २१ लाॅटची किंमत रु।२४,९२,०००/- असताना त्यातील ११ लाॅट रु। १८,६७,३४५/- किमतीला  ई-आॅक्शनद्वारे विक्री केलेले आहे। व १० लाॅट स्थगित ठेवण्यात आलेले
आहेत.

वरीलप्रमाणे तीन वेळा ई-आॅक्शनद्वारे विक्री शासनाचे मंजुरीने व शासकिय अधिका-यांच्या अघ्यक्षतेखाली केलेली असुन शासनाचे व्ह-ल्युएटर यांनी ठरविलेली एकुण किंमत रु।१,३०,२७,७५०/-  होत असताना त्यातील ५० टक्के भंगार विक्री करुन त्यातुन कारखान्याला रु. २,२९,३७,०१८/- एवढी
किंमत मिळाली आहे। यावरुन कारखाना व्यवस्थापनाने स्वच्छ हेतुने कामकाज केलेचे दिसुन येते। वरीलप्रमाणे आमचे संचालक मंडळाने कारखान्याचे वापरात नसेलेले व भविष्यातही कधी वापर होवु न शकनारे ब-याच वर्षापासुन पडुन असलेले भंगार मटेरियल रितसर परवानग्या घेवुन सर्व शासकिय कागदपत्रांची पुर्तता करुन ई-आॅक्शनद्वारे शासकिय प्रतिनिधींचे अध्यक्षतेखाली सभा घेवुन जास्तीत जास्त किमतीला विक्री केलेले आहे। विक्रीच्या सर्व रक्कमा कारखान्याच्या खात्यावर आरटीजीएस/एनईएफटी/डीडी/चेकद्वारे कारखान्याच्या समर्थ बँक,आय।सी।आय।सी।बँक या बँकेच्या खात्यावर जमा झालेल्या असलेचे चौकशी अधिकारी यांनी त्यांचे अहवालात नमुद केलेले आहे। यावरुन श्री।प्रकाश पाटील यांनी केवळ राजकिय आकसापोटी संचालक मंडळाची बदनामी करण्यासाठी तक्रार केलेचे दिसुन येत आहे। कारखान्याचे व्यवस्थापनाने भंगार विक्री करणेसाठी परवानगी मिळणेबाबत ठराव करुन, मालाच्या यादी, शासकिय व्हॅल्युएशन रिपोर्टसह मा।साखर आयुक्त यांची मंजुरी घेतली। मा।प्रादेशिक सहसंचालक सोलापुर यांचे आदेशाप्रमाणे ई-आॅक्शनर यांची नियुक्ती करुन, विशेष लेखा परिक्षक यांचे अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करुन भंगार मालाची रितसर विक्री केली आहे। सहा वर्षात मा।आमदार समाधानदादा आवताडे यांचे नेतृत्वाखाली चालेल्या दामाजी कारखान्याचा कारभार काटकसरीने व पारदर्शक करित आहोत। राजकिय विरोधापोटी  श्री। प्रकाश पाटील यांनी विस कोटीचे भंगार सहा कोटीला विकुन रक्कम हडप केलेचा बिनबुडाचा  बदनामी करणेसाठी केलेला आरोप कधीच सिध्द् होवु शकत नाही। चौकशी कामासाठी शासनाचा,कारखान्याचा विनाकारण खर्च,वेळ वाया घालविलेबध्द्ल व संचालक मंडळाची बदनामी केलेबध्द्ल त्यांचे विरोधात नुकसान भरपाई मागणेसाठी योग्य त्या कायदेशिर मार्गाचा अवलंब करणार असलेचे श्री राजेंद्र सुरवसे यांनी सांगीतले आहे।

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here