जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी 16,17,18 फेब्रुवारीला ऑनलाईन रोजगार मेळावा

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर, दि.11(जिमाका):-कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, सोलापूर यांच्यामार्फत दिनांक 16, 17 आणि 18 फेब्रुवारी 2022 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.

रोजगार मेळाव्यात ट्रेनी, वेल्डर, ईन्शुरन्स ॲडव्हायझर, नर्सिंग 10 वी पास/नापास, 12 वी, हेल्पर, सुरक्षा रक्षक, सीएनसी ऑपरेटर, आयटीआय मशिनिस्ट, ग्राईंडर, टर्नर, फिटर, डिप्लोमा मेकॅनिकल, ग्रॅज्युएट, बी. कॉम. एम.कॉम. एम.बी.ए. पोस्ट ग्रॅज्युएट, जीएनएम, बी.एसस्सी नर्सिंग अशा प्रकारची एकूण 432 रिक्तपदे आठ उद्योजकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचीत केलेली आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती व्हीडिओ कॉन्फरन्स अथवा टेलीफोन याद्वारे ऑनलाईन घेण्यात येणार आहेत.

आयोजित ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी www.roigar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून सहभागी व्हावे, याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या ०२१७-२९५०९५६ या दूरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here