जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून ध्वज निधी संकलन कार्यक्रमाचा शुभारंभ.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

सोलापूर दि.10 (जिमाका) :- सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2021 संकलन शुभारंभ तसेच ध्वजदिन निधी – 2020 चे उत्कृष्ट निधी संकलन केलेल्या कार्यालय प्रमुखांचा सत्कार कार्यक्रम आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते बहुउद्देशिय सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिप प्रज्वलन करून करण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शमा पवार, अप्पर पोलीस अधिक्षक (ग्रामीण) हेमंत जाधव, सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाळासाहेब पाटील, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील अनिल मेगशेट्टी, संजीव काशिद, आप्पासाहेब कोडग, लक्ष्मण कोळी, दिनेश नागणे, गुरूनाथ कुलकर्णी, सतिश रासकर, आशादेवी किवडे, राजेसाहेब शेख, मौला मुल्ला, मारूती शेवडे तसेच वीरपत्नी, वीरमाता, विविध शासकीय , निमशासकीय कार्यालयाचे अधिकारी, विविध संस्था, शाळा व महाविद्यालयाचे एन.सी.सी कॅडेट उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले की, देशाच्या संरक्षणासाठी जवान प्रतिकुल अशा परिस्थितीमध्ये सीमेवर आपले कर्तव्य बजावत असताना शहिद होतात. अशा शहीद जवानांच्या कुटूंबियांच्या जीवनातील अडी अडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्याचप्रमाणे युध्दात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी या निधीचा विनियोग केला जातो. या निधीच्या संकलनात सर्वांनी योगदान करावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. तसेच सोलापूर जिल्ह्याने 2020 मधील उद्दीष्ट 100 टक्के पूर्ण केले त्याच प्रमाणे ह्या वर्षीचे देखील उद्दीष्ट पुर्ण होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शमा पवार यांनी प्रास्ताविकामध्ये जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच शासनाने सोलापूर जिल्ह्यास सन 2020 या वर्षासाठी रूपये 1 कोटी 49 लाख 41 हजार 80 इतके सशस्त्र सेना सेना ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दीष्ट दिले होते. हे उद्दीष्ट जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दीष्ट 1 कोटी 67 लाख 90 हजार 122 म्हणजेच 112 टक्के उद्दीष्टपूर्ती करण्यात आल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद सैनिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ माळवदकर यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उमेश राठोड यांनी विशेष योगदान दिले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here