जनहितच्या आंदोलनाला यश मरवडे येथिल विषबाधा प्रकरणातील आरोपी संतोष कोंडूभैरी व आकाश फुगारे अखेर गजाआड.

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

 

गुंजवटे यांच्या निंलंबनाच्या मागणीवर ठाम आंदोलन सुरुच.

मरवडे येथील दोन चिमुकल्या मुलींचा विषबाधेतून दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे या दोघींच्या मृत्युस कारणीभुत असणारे व दुधामधे बेमाप भेसळ करणारे आरोपी संतोष लहु कोंडूभैरी व आकाश फुगारे अखेर पोलीसांच्या हाती लागले त्यानंतर पोलीसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्या दोंन्ही आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी दिली. यामुळे जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले, समर्थ दुध डेअरी मधुन मुदत संपलेले तारीख नसलेले व पूर्ण भेसळ असलेले पदार्थ श्रीखंड बासुंदी रबडी पनीर खाल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला या गंभीर घटनेची फीर्याद नोंदवण्यासाठी पीडीत चव्हाण कुटुंबीय 24 व 25 डिसेंबर 2021 रोजी पो.स्टे. ला गेले असता पो.नि.जोतीराम गुंजवटे यांनी फीर्याद घेण्यास टाळाटाळ केली व कर्तव्यात कुचराई केली त्याबद्दल भ्रष्ट व हप्तेखोर अधिकारी जोतीराम गुंजवटे यांना निलंबीत करेपर्यंत आदोलन सुरुच ठेवणार असल्याचेही देशमुख यांनी सांगीतले. त्याच बरोबर पुढे बोलताना म्हणाले की यातील आरोपी व पो.नि. गुंजवटे यांच्यामधे अर्थिक व्यवहार झाल्याचे खात्रीशिर समजते त्यामुळे अधिकाराचा दुरुपयोग करुन व कर्तव्यात कुचराई करुन पोलिस खात्याला बदनाम करण्याचे काम ते करत आहेत त्यामुळे त्यामुळे संबंधित भ्रष्ट अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करुन चौकशी करण्यात यावी अन्यथा सोलापूर – कोल्हापूर हायवे रोडवर उमाटे वस्तीजवळ 24/01/2022 रोजी 11.00 वाजल्यापासुन रास्तारोको आंदोलन करणार असल्याचेही सांगीतले व होणार्या परीणामास वरीष्ठ पोलीस अधिकारी जबाबदार असतील असैही ठणकाऊन सांगीतले.
यावेळी उपस्थित पप्पू दत्तु सर्जेराव गाडे, रघु चव्हाण बिरुदेव ढेकळे, बाळासाहेब नागणे नामदेव गायकवाड,सुरेश पवार , सरपंच नितीन घुले, दादासाहेब पवार,अजित पवार,दत्तात्रय गणपाटील,प्रकाश सूर्यवंशी,हैदर केंगार,रतीलाल केंगार,श्रीकांत गणपाटील, राहुल शिंदे,सतीश शिंदे,सिद्धेश्वर सूर्यवंशी, विजय पवार,शिवाजी केंगार,विकास दुधाळ,सुदर्शन रोंगे,दुशासन दुधाळ, सतीश शिंदे, संजय पवार,समाधान ऐवळे,गणेश पाटील, बालाजी पवार, दादासाहेब रोंगे, किसन रोंगे, रघुनाथ चव्हाण, राजाराम कोळी, अल्लाबक्ष इ जण उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here