कर्मवीर जयंतीचे औचित्य साधत माजी विद्यार्थ्याकडून प्रशालेला व्यायाम साहित्य भेट

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आज दि.23/09/2022 रोजी चिखलठाण येथील श्रीम.रा.बा.सुराणा विद्यालय चिखलठाण येथील स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य व सोलापूर जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष श्री राजेंद्रकुमार बारकुंड यांच्या प्रेरणेने कैलास कानगुडे केडगाव ता. करमाळा यांचे चिरंजीव श्री दिनेश कानगुडे मुंबई या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीचे औचित्य साधून डबल बार व सिंगल बार हे व्यायामाचे साहित्य करमाळा तालुक्याचे विकासप्रिय आमदार मा.श्री संजयमामा शिंदे करमाळा माढा विधानसभा मतदारसंघ यांच्या हस्ते करमाळा येथे प्रशालेचे मुख्याध्यापक यांना सुपूर्द केले.
या वेळी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य तथा मा. जि.प.उपाध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार बारकुंड,विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुराज माने व विद्यालयातील जेष्ठ शिक्षक धनंजय भोसले,शिवाजी मासाळ,लक्ष्मण गोडगे,साईनाथ लोहार ,अतुल जानभरे,हनुमंत लगस उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here