एक कोटीच्या करकंब पोलीस ठाण्याला उदघाटनासाठी  मुहूर्त नाही!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

एक कोटीच्या करकंब पोलीस ठाण्याला उदघाटनासाठी  मुहूर्त नाही!

करकंब पोलीस ठाण्याची सुसज्ज इमारत धूळखात पडून

करकंब ता पंढरपूर येथील पोलीस ठाण्याची एक कोटी रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेली सुसज्ज इमारत केवळ उदघाटनाला मुहूर्त मिळत नसल्याने तब्बल मागील सहा ते सात महिन्यापासून धूळ खात पडून आहे

मागील 10 वर्षांपूर्वी करकंब येथील पोलीस चौकीचे रूपांतर पोलीस ठाण्यात झाले पोलीस चौकीच्या जुन्या बांधकामाला धागडुजी करून कामकाज सुरू झाले होते मागील दोन वर्षांपूर्वी येथील पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीला मंजुरी मिळाली नवीन इमारतीचे काम पूर्ण होण्यास काही कारणास्तव विलंब झाला परंतु काम पूर्ण होऊन सहा ते सात महिन्याचा कालावधी लोटला आहे परंतु पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उदघाटन करण्याचा पक्का मुहूर्त काही केल्या सापडत नाही त्वरित उदघाटन करून नवीन इमारतीमध्ये पोलीस प्रशासनाचे काम सुरू करावे अशी मागणी करकंब व परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे

 

दोन वेळेला मुहूर्त राहिला चर्चेतच

येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन सहा ते सात महिन्याचा कालावधी लोटला आहे परंतु अध्यापर्यंत पोलीस ठाण्याची नवीन इमारत उदघाटनाच्या प्रतिक्षेतच राहिली आहे मागील सात महिन्यांपूर्वी आषाढी वारीच्या दरम्यान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची केवळ चर्चा दौऱ्यातील नोंदी विना चर्चाच राहिली नंतर कार्तिकी वारी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होईल अपेक्षित होते परंतु वेळेअभावी नुसत्या अपेक्षाच राहिल्या मागील तीन दिवसांपूर्वी माघी वारी झाली मग उद्घाटन होणार तरी कधी अशी चर्चा नागरिकांमधून होऊ लागली आहे

 

पोलीस कोठडीतील आरोपींचा मुक्काम करकंब मध्येच होणार

करकंब येथे एक कोटी 4 लाख रुपये खर्चून नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस ठाण्याची 4 हजार स्क्वेअर फूट सुसज्ज बांधकाम आहे यामध्ये यामध्ये एक प्रमुख अधिकाऱ्यांची केबिन असून इतर चौदा खोल्यांमध्ये पोलीस प्रशासनाच्या कामकाजासाठी निर्माण केल्या आहेत शिवाय तीन जेल रूम आहेत त्यामुळे आज पर्यंत पोलीस कोठडीतील आरोपींचा पंढरपूर मुक्काम रद्द होऊन करकंब मुक्काम असणार आहे

 

करकंब पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन त्वरित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत याबाबत दोन दिवसात तारीख निश्चित करू

शिरीष सरदेशपांडे

पोलीस अधीक्षक सोलापूर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here