ताराराणी पक्षाचा अमल महाडीक यांना जाहीर पाठींबा!

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

आगामी कोल्हापूर विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आवाडे गटाची बैठक ताराराणी पक्ष कार्यालय, इचलकरंजी येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, प्रा. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यादरम्यान विधानपरिषदचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांना प्रचंड बहूमताने निवडून आणूया, असे मत व्यक्त करून आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर पाठींबा दिला.

यावेळी बैठकीस जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, जनता बँक संचालक स्वप्निल आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक-निंबाळकर, माणगाव सरपंच राजू मगदूम, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, प्रकाश सातपुते, प्रकाश मोरे, प्रा. चंद्रशेखर शहा, रुबेन तात्या आवळे, रोहन आवळे, सर्जेराव पाटील, एम.के कांबळे यांच्यासह ताराराणी पक्षाचे सर्व नगरसेवक व आवाडे समर्थक उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here