अखेर अभिजित आबांनी सहकार शिरोमणीचे रणशिंग फुंकले! विठ्ठल व्यवस्थित चालवला सहकार शिरोमणी चालवायला काही अडचण नाही! सर्व सभासद शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निवडणूक लढवणार:-अभिजीत आबा पाटील

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

पंढरपूर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाळवणी कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज विचार विनिमय बैठक पंढरपूर येथे संपन्न झाली या निवडणुकीमध्ये प्रसिद्ध उद्योगपती डीव्हीपी, उद्योगसमूहाचे प्रमुख, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी अखेर रणशिंग फुंकले आहे.. विठ्ठल कारखान्याच्या विजयानंतर जवळजवळ आठ ते नऊ महिन्याच्या कालावधीनंतर पंढरपूर तालुक्यातील सगळ्यात महत्त्वाचा असा दुसरा सहकारी कारखाना म्हणून नावाजलेला, सहकार शिरोमणी वसंतरावजी काळे सहकारी साखर कारखाना, निवडणूक जाहीर होणार आहे..
यासाठी पंढरपूर तालुक्यातील सर्व सभासद शेतकऱ्यांना आज आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी अभिजित आबापाटील यांनी, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी, विरोधामध्ये काय काय उहा-पोह‌ केला. त्याबाबत सर्वांसोबत खुलासा केला.त्याचबरोबर, सहकार‌ शिरोमणी साखर कारखान्यावर किती कोटींचे कर्ज आहे. कारखाना व्यवस्थापनासाठी, ०३ ते ३.५ कोटी रुपयांचे खर्च झाल्याचे, आकडेवारी अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याबाबतही त्यांनी चेअरमन व सर्व संचालक मंडळाचा समाचार घेतला. त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात उसाचे गाळप होऊनसुद्धा शेतकऱ्यांचे पैसे कामगारांच्या पगारी का वेळेवर जात नाहीत. याचा आपल्या भाषणातून अभिजीत आबांनी जवळजवळ समाचार घेतला.
त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील अनेक काळे गटातील मान्यवर मंडळींनी यावेळेस उघडपणे अभिजीत आबा पाटील यांच्या गटात प्रवेश घेऊन आपण सहकार शिरोमणीची निवडणूक लढवावी, अशी मागणी यावेळी केली. त्यामुळे एकंदरच पंढरपूर तालुक्यातील सहकार शिरोमणी कारखान्याची निवडणूक बिनविरोध आशा संपुष्टात आले असून ही निवडणूक लवकर लागणार आहे असे चित्र आजच्या विचारविनिमय बैठकीतून स्पष्ट झाले.

चौकट-
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे जे सभासद आहेत.तेच सभासद सहकार शिरोमणीचे आहेत.माझ्या शेतकरी सभासदाला इथेही न्याय मिळाला पाहिजे.सभासद नक्की आमच्या बाजुने कल‌ देतील!अशा माझा विश्वास आहे.

अभिजीत आबा पाटील
चेअरमन विठ्ठल शुगर

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here