गनिमी काव्याने विश्व वारकरी सेनेचा पायी दिंडी सोहळा पंढरपूर मध्ये दाखल

satyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्रामयुट्युब

गनिमी काव्याने विश्व वारकरी सेनेचा पायी दिंडी सोहळा पंढरपूर मध्ये दाखल

मुक्कामाच्या ठिकाणी केले वृक्षारोपण

 

माझी वारी माझी जबाबदारी अभियानाअंतर्गत पायी दिंडी सोहळ्या मध्ये ज्या गावांमध्ये दुपारचे भोजन आणि रात्रीचे मुक्काम असायचे त्या गावांमधून निघत असताना अन्नदाता त्यांना एक वृक्ष भेट देण्यात आले

माझी वारी माझी जबाबदारी या अभियाना अंतर्गत विश्व वारकरी सेना व इतर काही वारकरी संघटना एकत्र येऊन आळंदी ते पंढरपूर कोरोना चे सर्व नियम पाळून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ठरल्याप्रमाणे 3 जुलैला आळंदी येथून वारकऱ्यांनी पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान केले परंतु हडपसर च्या समोर दिवे घाटामध्ये गणेश महाराज शेटे व सुधाकर महाराज इंगळे यांच्या समवेत 22 वारकऱ्यांना पोलिसांनी अडवले व लोणी काळभोर पोलीस स्टेशन मध्ये स्थानबद्ध करण्यात आले पण त्याच वेळेला तुकाराम महाराज भोसले राष्ट्रीय अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लोंढे महाराज यांच्यासमवेत 20 पदाधिकारी सासवडच्या जवळ पोहोचले होते व त्यांना फोन करून सांगण्यात आले की आपण माघारी न परतता माझी वारी माझी जबाबदारी या संकल्पनेची पूर्तता करण्या करीता आपण पंढरपूर पर्यंत पायी जावे हे सांगण्यात आले
रस्त्याने चालत असताना कोरोणाचे सर्व नियम पाळून व गावातील कुठल्याही मंडळीच्या संपर्कात न येता वारकरी मंडळी मजल दर मुक्काम पायी चालत राहिले या दिंडी सोहळ्यामध्ये बऱ्याच काही अडचणी आल्या कारण काही गावातील गावकरी मंडळी वारकऱ्यांना गावात ठेवण्याकरता घाबरत होते कारण की प्रशासनाचा रोष ओढवून घ्यायचा नव्हता.पण बऱ्याच गावकऱ्यांनी मनापासून स्वागत केले मुक्कामाची भोजनाची व्यवस्था करून दिली आणि तन मन धनाने वारकऱ्यांची सेवा केली आज पहाटे चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्या प्रमाणे गनिमीकावा पद्धतीने वारकर्‍यांनी पंढरपूर मध्ये प्रवेश केला चंद्रभागेचे स्नान केले, नगरप्रदक्षिणा केली आणि महाद्वारात नामदेव पायरी जवळुन भगवंताच्या कळसाचे दर्शन घेतले व माझी वारी माझी जबाबदारी या संकल्पनेची पांडुरंगाच्या चरणी पूर्तता केली
सर्व वारकरी संघटनांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात पायी वारी करून दाखवल्याबद्दल वारकरी मंडळी पाई वारकऱ्यांचे अभिनंदन व्यक्त करत आहेत
पायी दिंडी सोहळ्या मध्ये समोरील वारकरी मंडळी सहभागी झाली होती राष्ट्रीय अध्यक्ष तुकाराम महाराज भोसले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरिभाऊ महाराज लोंढे, तानाजी महाराज मुळे, रामचंद्र महाराज मुळे, किसन महाराज मुळे, मधुकर महाराज मुळे, कालिदास महाराज भोसले, दादा महाराज शेख, अशोक महाराज मुळे, जयश्री रामचंद्र मुळे, सुवर्णा ताई मुळे हि मंडळी उपस्थित होती

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here