जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवू
जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण;भाजयुमोचे अंकुश भैय्या आवताडे यांच्या पुढाकारातून पत्रकारांचा सन्मान
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
“राष्ट्र प्रथम” ही संकल्पना मनात ठेवून आणि निष्कलंक, अभ्यासू नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून राज्यासह जिल्ह्यात भाजपकडे मोठ्या प्रमाणात लोक आकर्षित होत आहेत.“काँग्रेसमुक्त भारत” हे अभियान आपण सर्वांनी राबवायचे आहे. राष्ट्रहित हाच आपला अंतिम हेतू असला पाहिजे. पक्षात नवीन कार्यकर्ते येत असले तरी जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा फडकवायचा आहे, असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत (नाना) चव्हाण यांनी केले.
कामती येथील सीनाई ऍग्रो टुरिझम येथे दिवाळीचे औचित्य साधून पत्रकारांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकर (नाना) वाघमारे, आयोजक अंकुश भैय्या अवताडे, माजी नगरसेवक सुशील भैया क्षीरसागर, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, सीनाई ऍग्रो टुरिझमचे कार्यकारी संचालक लहू तात्या आवताडे, सागर लेंगरे, विशाल डोंगरे, युवराज अवताडे, ज्ञानेश्वर पाटील, संदीप आवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना अंकुश भैय्या अवताडे म्हणाले,“गेल्या अनेक वर्षांपासून भाजपासाठी कार्य करताना मला मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. पक्षाने वेळोवेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पंखांना बळ दिले. नवीन कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे थोडं धास्तावल्यासारखं वाटलं होतं, मात्र शशिकांत नानांनी मायेचा पदर मस्तकावर धरत मोठा आधार दिला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नानांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठेने काम करून पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडू.”
तसेच, “कामती जिल्हा परिषद गटात संगीता आवताडे यांना संधी मिळाली, तर त्या संधीचे सोनं करू,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात उपस्थित पत्रकार बांधवांमध्ये महेश कुलकर्णी (लोकमत), भारत नाईक (पुढारी), बापूसाहेब काळे (जनसत्य), रजनीश कसबे (एकमत), अशोक कांबळे (मॅक्स महाराष्ट्र), नानासाहेब ननवरे (तडका न्यूज), विजय पुजारी (सोलापूर टाइम्स), कैलास रणदिवे (दामाजी एक्सप्रेस), योगेश शिंदे (महाराष्ट्र न्यूज), नेताजी शिंदे (माणदेश नगरी), दत्तात्रय पांढरे (डी.पी. मराठी), सुहास परदेशी (तरुण भारत), सावता जाधव (पंढरी भूषण), (सिद्धेश्वर मम्हाने जनसत्य )(प्रकाश गव्हाणे (सुराज्य), सुहास घोडके (पुण्यनगरी) आदींचा सन्मान करण्यात आला.
*चौकट*
*सामाजिक कार्यामुळे अंकुश आवताडेची क्रेझ**कामती भागात व जिल्हा परिषद गटात भाजपा युवा मोर्चाचे अंकुश अवताडे यांनी बॅनरबाजी व जाहिरात बाजी न करता अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये त्यांनी गोरगरीब ऊसतोड कामगारांना, शेतमजुरांना वारंवार मदतीसाठी पुढे गेले आहेत. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे अंकुश आवताडे यांची या भागात वेगळी क्रेझ निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांच्या मातोश्री रणांगणात उतरल्यास विजय नक्की होईल असा विश्वास येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे*.

