मंजूर असलेल्या रोजगार हमी योजनेतील कामांना शासनाकडून मुदतवाढ लवकरच कामे सुरु होणार .- आ.बबनदादा शिंदे
मनरेगा कामांना दि.31 डिसेंबर,2024 पर्यंत मुदत वाढ.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी (मनरेगा) योजनेअंतर्गत सन 2022-23 व सन 2023-24 या वर्षातील माढा,पंढरपूर व माळशिरस तालुक्यात कामे मंजूर झालेल्या कामांना मुदत वाढ मिळाली असून त्याबाबतचे पत्र शासनाने काढले असल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली.
अधिक माहिती देताना आ.शिंदे म्हणाले की, माढा विधानसभा मतदारसंघात सन 2022-23 व सन 2023-24 या वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी (मनरेगा) योजनेअंतर्गत (कुशल) कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली होती. सदर कामांची मुदत संपलेली असल्याने त्यांची हजेरीपट काढण्यात आलेला नाही. तसेच सध्या दुष्काळी परिस्थीमुळे अनेक कामे अपूर्ण स्थितीत राहिलेली आहेत. सदर कामे पुर्ण करुन घेणे अत्यंत गरजेचे असल्याने रोजगार हमी कामांना मुदत वाढ मिळणेसाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु होते. याबाबत अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेवून सोलापूर जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेची कामे तातडीने पुर्ण करणेसाठी मुदतवाढ देणेविषयी चर्चा केली. यावर राज्य शासनाच्या नियोजन रोहयो विभागाने मंजूर रोजगार हमी योजनेच्या कामांना मुदत वाढ दि.31 डिसेंबर, 2024 पर्यंत देऊन सदर कामे पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामांमुळे गावातील अंतर्गत रस्ते होणार असून ग्रामीण विकासाला चालना मिळणार असल्याची माहीती
आ.शिंदे यांनी दिली.
चौकट
माढा मतदारसंघातील माढा पंढरपूर माळशिरस तालुक्यात रोहयो मधून अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी 15 कोटी रूपये निधी मंजूर करण्यात आला असून काही ठिकाणची कामे मुदतवाढ न मिळाल्याने सुरु झालेली नाहीत. आता शासनाने डिसेम्बर 2024 पर्यंत मुदतवाढ दिल्याने सर्व कामे पुर्ण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
आ. बबनदादा शिंदे