वाखरी असो किंवा भाळवणी नक्कीच मी जिल्हा परिषद निवडणूक लढवणार:- धनंजय उत्तम काळे
धनंजय काळे विरुद्ध समाधान काळे अशी थेट लढत नक्कीच आपल्याला जिल्हा परिषद निवडणुकीत दिसणार?
धनंजय काळे यांना आमदार अभिजीत आबा पाटील देणार आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मोठी ताकद!
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पंढरपूर तालुक्यातील पश्चिम भागात अतिशय महत्त्वाची ठरणारी व परंपरागत काळे विरुद्ध काळे अशी होणारी जिल्हा परिषद निवडणूक यंदाही संपूर्ण सोलापूर जिल्ह्याबरोबर पंढरपूर तालुक्यात लक्षवेधी ठरणार आहे…
पूर्वाश्रमीचे कट्टर राजकीय विरोधक सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान काळे यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजीत आबा पाटील यांचे विश्वासू व सांगोला विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार धडाकेबाज माजी आमदार एडवोकेटशहाजी बापू पाटील, यांचे भाचे असणारे संचालक धनंजय उत्तम काळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समाधान काळे यांना शह देण्यासाठी, भाळवणी किंवा वाखरी जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याबाबत संपूर्ण पंढरपूर तालुक्यात चर्चा सुरू असून याला संचालक धनंजय उत्तम काळे यांनीही दुजोरा दिला आहे..
पंढरपूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाची व परंपरागत काळे विरुद्ध काळे ही लढत अतिशय लक्षवेधी ठरणार असून यामध्ये संचालक धनंजय उत्तम काळे यांनी आपण नक्कीच युवा नेते समाधान काळे यांचा पराभव करू व सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये कर्तव्यदक्ष आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू असा ‘पण’ केला आहे..
समाधान काळे हे चेअरमन कल्याणराव काळे यांचे बंधू आहेत. कल्याणराव काळे यांनी आपला भाळवणी येथे असणारा सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखाना काही दिवसांपूर्वी पुण्याच्या एका उद्योगपतीलाच भाडेतत्त्वावर चालविण्यास दिल्यामुळे त्या भागातील सर्व सभासद शेतकरी सर्व नागरिक व मतदार ही त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात नाराज झालेले आहेत.. या कारखान्याच्या बाबतीतही वेळोवेळी व पूर्वीपासून काळे यांचे विरोधक असणारे अॅडवोकेट दीपक दादा पवार यांनीही आवाज उठवला आहे.. त्यांचे गावही भाळवणी जिल्हा परिषद गटात येत असून ते ते सुद्धा सद्यस्थितीला माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांचे समर्थक असून, ते धनंजय उत्तम काळे यांचे एक चांगले सहकारी असल्यामुळे या सर्व कारखानदारीच्या विषयाचा नक्कीच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये इम्पॅक्ट होणार असून याचा फायदा संचालक धनंजय काळे यांना होणार असल्याबाबतही पंढरपूर तालुक्यातील सर्व नागरिकांमधून बोलले जात आहे. फक्त आता कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवारी घेणार व पंढरपूर तालुक्यातील पश्चिम भागातील दोन महत्त्वाच्या असणाऱ्या जिल्हा परिषद गटावर कोणाचा हुकमी एक्का चालणार हे लवकरच आरक्षण सोडत झाल्यानंतर समजणार आहे.

