*विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत वारक-यांना अल्पोहाराचे वाटप!*
(२४,हजार वारकऱ्यांना अल्पोपहार पाकिटांचे वाटप, करणार!)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पंढरपूरला आषाढी एकादशी वारी निमित्त जाणाऱ्या विठ्ठल भक्त वारकऱ्यांची सेवा करण्याच्या पवित्र भावनेतून पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही कारखाना कार्यस्थळावरून जाणा-या निरनिराळ्या दिंड्या व दिंडीतील वारक-यांना दि.19/07/2026 पासून लाडू व चिवडा या अल्पोहाराचे वाटपास सुरूवात करण्यात आली.
प्रतिवर्षी नाशिक,अहिल्यानगर, जामखेड, शेगांव,नेवासा,पैठण व इतर ठिकाणच्या अनेक पालख्या व दिंड्या विठ्ठलराव शिंदे कारखान्यावरून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला श्री.विठ्ठल च्या दर्शनासाठी जात आहेत. कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा.आ.बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली या पालख्या व दिंड्या मध्ये समाविष्ट असलेल्या वारक-यांना प्रतिवर्षी कारखान्यामार्फत लाडू व चिवडा या अल्पोहाराचे वाटप करण्यात येत आहे. चालु वर्षी ही 19 जुलै पासून वारक-यांना लाडू व चिवडा अल्पोहाराचे वाटप जिल्हा दुध संघाचे चेअरमन तथा, कारखान्याचे संचालक मा.श्री.रणजितसिंह शिंदे व त्यांच्या सौभाग्यवती सौ. प्रणिताताई रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वारकऱ्यांचे प्रेमपूर्वक स्वागत करुन त्यांना अल्पोहाराचे वाटप करण्यात आले. या वर्षीही 20 हजार लाडू व चिवडा पाकिटांचा वारक-यांना अल्पोहार वाटप करण्यात येणार आहे.
जामखेड येथील ह.भ.प रासकर महाराज यांची वारक-यांची दिंडी प्रती वर्षी मुक्कामी कारखाना कार्यस्थळावर येत असून त्यांना कारखान्यामार्फत जेवण देणेत आहे, या वर्षीही 21 जुलै रोजी मुक्कामी दिंडी येणार असून मुक्कामी दिंडीतील वारक-यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, जनरल मॅनेजर पी.एस.येलपले, चिफ इंजिनिअर एस.डी.कैचे, चिफ केमिस्ट अे.के.जगताप, केन मॅनेजर एस.पी.थिटे, डिस्टीलरी मॅनेजर पी.व्ही.बागल, असि.परचेस ऑफिसर एस.व्ही.चौगुले,सिव्हील इंजिनिअर एस.आर. शिंदे,सुरक्षा अधिकारी मंगेश रावळ, कामगार प्रतिनिधी अनिल वीर हे उपस्थित होते.
*चौकट-*
*मा.आ.बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या “ वारकरी सेवा हीच विठ्ठल सेवा ” मानत विठ्ठलराव शिंदे कारखाना दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांसाठी लाडू व चिवडा वाटप हा सेवाभावी उपक्रम राबवत आहेत. कारखान्याच्या या सेवाभावी उपक्रमामुळे वारक-यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मागील 20 वर्षापासून कारखान्यामार्फत हा उपक्रम राबविणेत येत आहे*.
*मा.श्री.रणजितसिंह शिंदे*
