चांगल्या माणसांना पुढे आणण्याची जालीहाळ ग्रामस्थांची भूमिका कौतुकास्पद- मा.आ.प्रशांतराव परिचारक
पांडुरंग परिवाराचे युवा खंदे समर्थक जालीहाळ गावचे युवा सरपंच सचिन चौगुले यांनी गावासाठी विकासाभिमुख कारभार केला,दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून गावातील चांगुलपणा,शैक्षणिक,गुणवत्ता यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कर्तव्य बजावणाऱ्या नोकरदार,विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन जालिहाळ गावाचे नावलौकिक वाढवणाऱ्या गुणवंतांचा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सन्मान सोहळा पार पडतोय,ही भूमिका कौतुकास्पद आहे.
गाव पातळीवर कारभार करीत असताना राजकारणापलीकडे जाऊन लोकहिताच्या कामांना प्राधान्य दिल्यास,जनता आपल्या पाठीशी सदैव असते.हे काम सचिन चौगुले यांनी करून दाखवल्यामुळे आदर्श सरपंच पदाचा बहुमान, जनमाणसातून मिळवल्याचे गौरव उदगार सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार तथा पांडुरंग परिवाराचे नेते प्रशांतराव परिचारक यांनी बोलताना व्यक्त केले.
जालिहाळ तालुका मंगळवेढा येथे विविध स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या
आप्पासाहेब सोलनकर(कर संकलन विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका),अंकुश निळे(तलाठी नाशिक),सुनिल पाटील(शिक्षक सांगली),संजय डोरले(शिक्षक माळशिरस)
रविंद्र पाटील(आदर्श शिक्षक),म्हाकु बरकडे(मुख्याध्यापक पदी निवड),
राहुल कांबळे(आदर्श ग्रामसेवक),अभिजीत लाड(आदर्श ग्रामसेवक),नवनाथ चौगुले(गुणवंत वायरमन) या सव गुणवंताचा व पुरस्कार मिळालेल्यांचा मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
परिचारक पुढे म्हणाले,मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये वास्तविक पाहता जालिहाळ गावाला कायमची पाणीटंचाई भेडसावत असताना,कोणत्याही प्रकारचे आर्थिक सोर्स नाहीत.केवळ इच्छाशक्तीच्या बळावरती वारंवार आपल्या हाती घेतलेल्या विकास कामाला पाठपुरावा करीत,गावामध्ये तीन कोटीची विकास कामे करून सचिन चौगुले यांनी जालिहाळ गावाला नवे वैभव प्राप्त करून दिले.
ऊसतोड मजूर यासह पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित करून आपली उपजीविका करणाऱ्या गोरगरिबांची मने जिंकण्यात तसेच सलग दहा वर्षे गावचा लोकप्रतिनिधी सरपंच म्हणून आपण त्यांना संधी दिलात,त्याला तडा न जाऊ देता कार्य तत्परतेने चौगुले गावाला सेवा देत आहेत.
नंदेश्वर रस्त्याचा प्रश्न, जल जीवनची कामे, गावातील इतर रस्त्याची कामे, विविध विकास कामासाठी वारंवार आमच्याकडे हट्टास असतो, मालक निधी मिळवून द्या,गेल्या तीन वर्षापासून आम्ही गावात कामे करू शकत नाही, यासह अनेक अडचणी घेऊन सतत पाठपुरावा करणारा युवा नेता, उमदा नेता, असा या गावाला लाभला.मी ही पहिल्यांदा खर्डी गावचा सरपंच होतो,त्यावेळी निधीचा मोठा तुटवडा होता, मात्र सध्या सुदैवाने शासनाच्या अनेक योजनेतून गावाला निधी पुरेपूर मिळतोय, योग्य प्रकारे नियोजन झाल्यास नक्कीच आपण गावामध्ये अनेक कामे करू शकता. भविष्यामध्ये विकास कामासाठी आपण कुठे कमी पडणार नाही. आम्ही सर्वतोपरी सहकार्य करत राहू असा विश्वास परिचारक यांनी बोलताना व्यक्त केले.
परिचारक यांनी होऊ घातलेल्या विधानसभेच्या तोंडावरती सरपंच सचिन चौगुले यांनी केलेल्या मागणी नुसार,मालक सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे.आपण विधानसभा लढवावी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची तुतारी हाती घेऊन निवडणूक लढविल्यास नक्की विजयी होऊ,या मागणीवर परिचारक यांनी उत्साहीत असलेल्या कार्यकर्त्यांना रुको सफर करो असा इशारा करत…नक्कीच येत्या काही दिवसांमध्ये जे आपल्या मनात आहे,तोच निर्णय घेणे भाग पडणार आहे,कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण राजकारण करत असल्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन सध्या पितृपक्ष सुरू आहे चार दिवस थांबा त्यानंतर भूमिका जाहीर करू असे प्रतिपादन करून उपस्थित कार्यकर्त्यांची मने जिंकली.
यावेळी व्यासपिठावर दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील,व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात,दामाजी शुगरचे संचालक औदुंबर वाडदेकर,माजी उपसभापती काशिनाथ पाटील,न.पा.पक्षनेते अजित जगताप,संचालक गौरीशंकर बुरकुल,राजेंद्र पाटील,महादेव लुगडे,सुरेश कोळेकर,तानाजी कांबळे,मा.जि.प.सदस्य नामदेव जानकर,अशोक माळी,विजय बुरकुल,पप्पु स्वामी,कन्हैय्या हजारे,बबलु सुतार,भागवत भुसे,नितीन घुले,माधवानंद आकळे,सिद्धेश्वर मेटकरी,श्रीकांत गणपाटील,सुनिल थोरबोले,हौसाप्पा शेवडे,शिवाजी वाघमोडे,रघुनाथ पडोळकर,हरीभाऊ यादव,नागेश कनशेट्टी,विष्णू मासाळ,सुरेश पाटील,तायाप्पा गरंडे,रघुनाथ बेलदार,धनाजी बिचुकले,शरद डोईफोडे,विनोद बिराजदार,सुरेश खटकाळे,लक्ष्मण नागणे,के.डी.दत्तु,शिवाजी जाधव,शिवाजी आकळे,संजय पाटील,हरीदास हिप्परकर,बाळासाहेब सांगोलकर,तानाजी पवार,पिंटु गवळी,प्रकाश पवार,माणिक पाटील,दिगंबर शिंदे,शशिकांत कस्तुरे,मधुकर सावंत,बंडु करे,सज्जन बावचे,संभाजी मेटकरी,बाळासाहेब नागणे,जालिहाळचे सरपंच सचिन चौगुले,उपसरपंच भिमराव कोरे,ग्रा.पं.सदस्य नानासो माने,जालिंदर चौगुले,आप्पासो लोखंडे,समाधान दोडगे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दत्ता सोलनकर यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.