
भविष्यात शेतकऱ्यांचे राहिलेले वाड्यावस्त्यावरील रस्ते सुद्धा करून देणार -चरणराज चवरे
(पेनूर येथे शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या जिल्हा नियोजन फंडातून २० लाखाच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन उर्वरित मंजूर झालेल्या 18 रस्ते देखील लवकरच चालू करणार)
मोहोळ तालुक्यातील तसेच पेनूर येथील जनतेस शब्द दिला होता की वाड्यावस्त्यावरील सुद्धा रस्ते करून देणार त्यासाठी सदैव प्रयत्न करत राहणार कारण मी पण एक शेतकरी असून पावसाळ्यात शेतकऱ्यांचे ये जा करण्यासाठी जे हाल होतात ते हाल न होण्यासाठी अशा वस्त्यांवरील रस्ते होणे गरजेचे आहे.पुढील काळात देखील राहिलेल्या वाड्यावरस्त्यावरील शेतकऱ्यांच्या मागणीवरून रस्ते तयार करण्यासाठी नीती उपलब्ध करणार व त्यासाठी शासन दरबारी व नियोजन फंडातून जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न करणार असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी केले
पेनूर (ता.मोहोळ) येथील आतकरे वस्ती रस्ता खडीकरण करणे व टेकळे वस्ती येथे रस्ता खडीकरण करणे.शेतकऱ्याच्या मागणीनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख नियोजन समिती सदस्य चरणराज चवरे यांच्या जिल्हा नियोजन फंडातून २० लाख रुपये निधी उपलब्ध करण्यात आला होता त्या रस्त्यांचे भूमिपूजन उपसरपंच सागर मास्तर चवरे,बागायतदार कुंडलिक टेकळे,शिवाजी माने,मारुती टेकळे,मदन आतकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे,उद्योजक सागर मास्तर चवरे,पैलवान बाळासाहेब चवरे,बागायतदार कुंडलिक टेकळे,सुभाष माने,मदन आतकरे,दिगंबर टेकळे,दत्तात्रय माळी,मारुती टेकळे,ज्योतीराम आतकरे,अमोल आतकरे,अर्जुन टेकळे,विकास टेकळे,योगेश आतकरे,धनाजी चवरे,पांडुरंग माळी,संभाजी आतकरे तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.