*.भीमा कारखान्याच्या ४६ व्या गळीत हंगामाला सुरुवात; शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत धनंजय महाडिक यांच्या हस्ते संपन्न*
(उच्चांकी दराचा महाडिक पॅटर्न यंदाही कायम राहणार – खा. धनंजय महाडिक)
(भीमा कारखान्याच्या ४६ व्या गळीत हंगामाचा श्रीगणेशा)
(खासदार धनंजय महाडिकांच्या हस्ते ऊस गाळपाला सुरुवात, यंदा ‘विक्रमी’ धुराची पेटणार चूल!)
(भीमा कारखान्याच्या विकासाची ‘महाडिक एक्स्प्रेस’ सुसाट, विक्रमी दर देणार)
. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचा ४६ वा गळीत हंगाम समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. कारखान्याच्या गव्हाण पूजनाचा हा मंगलमय सोहळा खासदार श्री. धनंजय महाडिक , खेलोबा वाघमोडे (फरांडे महाराज) श्री.शिवाजीराव काळुंगे सर श्री. सचिन जाधव श्री. मानाजी बापू माने यांच्या शुभहस्ते पार पडला.
खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी बोलताना कारखाना कार्यक्षेत्रात पाऊस चांगला झाला असल्याने ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे . यंदाचा हंगाम ०७ लाख गाळप होईल अशी आशा व्यक्त केली आहे . ते म्हणाले की, “विश्वराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा कारखाना यशस्वीपणे वाटचाल करत आहे. ४६ वा गळीत हंगाम देखील यशस्वी होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर देईल, याची खात्री आहे.
कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी आगामी गळीत हंगामाची माहिती दिली. ते म्हणाले, “शेतकरी बांधवांचा विश्वास आणि कष्टामुळेच भीमा कारखान्याची प्रगती होत आहे. या हंगामात गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले असून, ते पूर्ण करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. सभासदांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवून सहकार्य करावे, जेणेकरून मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही सर्वोच्च दर देण्यात भीमा कारखाना अग्रेसर राहील.”
यावेळी कारखान्याचे कार्यक्षम चेअरमन विश्वराज महाडिक हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती व इतर निवडणुकांमध्ये अजून आमच्या भीमा परिवारासमोर कुणाचा प्रस्ताव आलेला नसून तसा कोणाचा प्रस्ताव आला तर 2017 च्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून काम केले होते तसे काम पुन्हा एकदा आम्ही सर्वजण मिळून करू त्याचबरोबर कोणाकोणाचे किती किती गट होतात पाहूया त्यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेणार आहे
खासदार धनंजय महाडिक

