
सौ.सुप्रिया पाटिल यांची साडी व्यवसायातुन उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी!
(गोरगरीब व गरजू महिलांना लाखों रुपयांचा उद्योग व्यवसाय)
( पाटील परिवाराचा सौ सुप्रिया पाटिल यांना भक्कम पाठबळ)
सोलापूर जिल्ह्यातील पण मुळच्या पंढरपूर तालुक्यातील असणाऱ्या सौ सुप्रिया बापुसाहेब पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात आज घरगुती साडी विक्रीच्या व्यवसायातुन लाखों रुपयांची उलाढाल केली असुन त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून शहरातील गोरगरीब व कष्टकरी गरजु महिलांना मोठा आर्थिक आधार दिला आहे..
सौ सुप्रिया पाटील यांनी सुरूवातीला कमी भांडवलावर आपला साडी विक्रीचा व्यवसाय सुरू केला.. फक्त १० हजार रुपयांच्या भाग भांडवलावर हा व्यवसाय त्यांनी अंत्यंत चिकाटीने व अथक कष्टाने सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील प्रगती नगरात सुरू केला. हळूहळू या साठी व्यवसायाची व्याप्ती वाढवून परिसरातील महिलांना रोजगार निर्मितीचे एक सक्षम साधन निर्माण करून दिले. थोड्याच दिवसात एका वित्तिय संस्थेने त्यांना एक भाग भांडवल उपलब्ध करून दिले. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही… अधिकाधिक लोकांपर्यंत व्यवसायाची माहिती देऊन आपला व्यवसाय वृद्धिंगत केला. आज त्यांच्या व्यवसायाची उलाढाल लाखो रुपयांत असून सौ सुप्रिया बापुसाहेब पाटील यांनाही त्यांच्या कुटुंबियांकडून या व्यवसायासाठी भक्कम अशी साथ वेळोवेळी मिळत गेली.. त्यांना त्यांचे पतीराज बापुसाहेब पाटील यांनीही या व्यवसायासाठी बहुमोल असे योगदान दिले आहे…
अधिकाधिक कष्ट व मेहनत परिक्षम घेतल्यास कोणतेही उदिष्ट जास्त अवघड जात नाही.आपली अपेक्षापूर्ती चांगल्या पद्धतीने साध्य होते. आम्ही आमचा हा व्यवसाय सोलापूर जिल्ह्यात लवकरच विस्तारीत करणार आहोत
सौ. सुप्रिया पाटील
(एक यशस्वी महिला उद्योजक)
