फुलचिंचोली येथेप्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी!
शिवसेनेच्या महिला संपर्कप्रमुख, मुबीना मुलानी यांच्या विशेष प्रयत्नामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर!
(प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्यास शासनाची मंजुरी)
पंढरपूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व पूर्व भागातील महत्त्वाच्या अशा फुलचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे, प्राथमिक आरोग्य केंद्रात श्रेणी वर्धन करण्याचा शासन आदेश प्राप्त झाला असून या प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत सातत्याने शासन दरबारी विविध माध्यमांच्या माध्यमातून पाठपुरावा पंढरपूर पंचायत समितीच्या सदस्या व शिवसेनेच्या नेत्या मुबीना मुलाणी यांनी केला असून त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे.
यासाठी पंचायत समितीचे सदस्य मुबिना मुलांणी यांनी खूप दिवसापासून राज्याचे कर्तव्यदक्ष एकनिष्ठ लोकनेते मुख्यमंत्री एकनाथ भाईजी शिंदे त्याचबरोबर राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत सर, सांगोला विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार अँड शहाजी बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे प्रयत्न केले होते. त्यास आज शासन निर्णय जारी करून फुलचिंचोली वासियांना एक आनंदाची बातमी दिली आहे.
हा शासन निर्णय प्रसिद्ध झाला असून मौजे फुलचिंचोली येथे सुरुवातीला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असून त्यास शासनाकडून खासबाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये श्रेणी वर्धन करण्यात आले आहे.
यासाठी महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून आदेश करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या पंढरपूर पंचायत समितीच्या सदस्या शिवसेनेच्या नेत्या मुबीना मुलाणी यांचे विशेष प्रयत्न लाभले आहेत.