
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गाळपास आलेल्या उसास २८०० रुपये एवढा दर आम्ही सर्व शेतकरी सभासदांना वेळेत दिला आहे:-शिवानंद पाटील)
(सर्व घटकांना सामावुन घेवुन दामाजी कारखान्याच्या प्रगतीसाठी काम केले.चेअरमन श्री शिवानंद पाटील)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची अधिमंडळाची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाली। सभेच्या सुरुवातीला कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व।कि।रा। मर्दा तसेच संस्थापक व्हा चेअरमन स्व।रतनचंद शहा शेठजी, श्री संत दामाजीपंत यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे मार्गदर्शक प्रा।शिवाजीराव काळुंगे, चेअरमन श्री शिवानंद पाटील, व्हा।चेअरमन श्री तानाजीभाऊ खरात, कारखान्याचे माजी चेअरमन अùड।नंदकुमार पवार, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन श्री राहूल शहा, माजी व्हा।चेअरमन श्री रामचंद्र वाकडे, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन श्री दामोदर देशमुख, उपस्थित संचालक व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाची अध्यक्षीय सुचना संचालक औदुंबर वाडदेकर यांनी मांडली व त्यास संचालक भारत बेदरे यांनी अनुमोदन दिले।
त्यानंतर संचालक दिगंबर भाकरे यांनीè अहवाल सालात व त्यानंतर दिवंगत झालेले कारखान्याचे सभासद, शेतकरी, कामगार, देशातील कलावंत, शास्त्रज्ञ, खेळाडू, साहित्यीक यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहून सभेचे कामकाजास सुरुवात झाली।
कारखान्याचा सन २०२४-२५ चा अहवाल सादर करताना चेअरमन श्री।शिवानंद पाटील म्हणाले कि, मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी हा केंद्रबिंदु मानुन ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा। तसेच सामान्य शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी यांचा विकास व्हावा या उद्देशाने आदरणीय कै। कि।रा।मर्दा ऊर्फ मारवाडी वकिलसाहेब व कै। रतनचंद शहा शेठजी, कै।चरणुकाका पाटील यांनी सहकारी तत्वावर सुरु केलेल्या या आपल्या साखर कारखान्याची वरचेवर प्रगती व्हावी या हेतुने आपण सर्वजण प्रयत्न करित आहोत। संस्थेसमोर मोठया प्रमाणात आर्थिक अडचणी असताना निवडणूकीमध्ये सभासद-शेतकरी यांनी या संचालक मंडळावर दाखविलेल्या विश्वासास पात्र राहुन आपणां सर्वांची या संस्थेवर असणारी निष्ठा व सहकार्यामुळे येणा-या अडचणीवर मात करुन हा कारखाना प्रगतीपथावर आणण्याचा प्रयत्न हे संचालक मंडळ करित आहे। कारखान्याकडे कोणताही उपपदार्थ निर्मिती प्रकल्प नसताना, आर्थिक अडचणी असताना एफ।आर।पी।रु।२५७१।८६ असुन सुध्दा स्पर्धेत टिकुन जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करणेसाठी झालेल्या गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाला रु।२८००/- दर वेळेत दिला आहे। हंगामातील ऊस उत्पादकांची बिले, तोडणी-वाहतूक ठेकेदारांची देणी, कारखान्यातील कर्मचा-यांचे आज अखेरचे पगार वेळेवर करुन त्यावरील प्राùव्हीडंट फंड, कर्मचारी पतसंस्था कपात व इतर कपाती वेळचेवेळी संबंधीताना दिलेल्या आहेत। कामगारानीही आमचे संचालक मंडळाचे आवाहनाला प्रतिसाद देवुन आफ सिझन कालावधीमध्ये सहकार्य केले आहे। निवडणुकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे मंगळवेढा तालुक्यातील ७/१२ उतारा असणा-या १२४५२ शेतक-यांना सभासदत्व देण्याचे काम या संचालक मंडळाने केलेले आहे। आजअखेर कारखान्याचे ४३,०१८ सभासद आहेत। काटकसर व पारदर्शी कारभार करण्यास हे संचालक मंडळ कटिबध्द् असणार आहे। शिवाय माजी आमदार श्री प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन श्री भगिरथ भालके यांचेही या कारखान्यास सहकार्य लाभले आहे। दुष्काळी परिस्थितीमुळे ऊसाची उपलब्धता कमी होती त्यामुळे गेली दोन हंगामात गाळप कमी झाले। कारखाना गळीत हंगाम सुरु करण्यासाठी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा।श्री शिवाजीराव काळुंगे, जिजामाता पतसंस्थेचे श्री रामकृष्ण नागणे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन श्री।राहुल शहा, कर्मयोगी पतसंस्थेचे मा।उमेश परिचारक, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन श्री दामोदर देशमुख, यांनी आर्थिक सहकार्य केले। एन।सी।डी।सी। मार्फत मिळालेल्या ९४ कोटी कर्जाचा या संचालक मंडळाने योग्य रितीने विनियोग केला असलेची सविस्तर माहिती सांगीतली। येणा-या गळीत हंगामात सर्व यंत्रणा सज्ज केली असून या गळीत हंगामात साडे पाच लाख मे।टन गाळपाचे उद्षि्ट संचालक मंडळाने ठेवले आहे। येणा-या गळीत हंगामातील गाळपासाठी येणा-या ऊसाला इतर कारखान्याच्या बरोबरीने दर देण्यास कटिबध्द असल्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी सांगीतले।
कारखान्याचे प्र।कार्यकारी संचालक श्री रमेश जायभाय यांनी मागील वार्षिक सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा संस्थेच्या कामकाजाविषयी अहवाल स्विकारणे, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके स्विकारणे व त्यास मान्यता देणे, वैधानिक लेखापरिक्षक यांचेकडून आलेला लेखा परिक्षण अहवाल वाचून नोंद घेणे, संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्विकारणे व त्यास मान्यता देणे, आर्थिक वर्षात अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या जमाखर्चास मंजूरी देणे, पुढील आर्थिक वर्षाकरिता संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, पुढील वर्षाकरिता वैधानिक लेखापरिक्षक व आवश्यकतेनुसार इतर सल्लागारांच्या नेमणूका करणे, आर्थिक वर्षातील अनावश्यक भंगार माल विक्रीस मान्यता देणे इत्यादी विषय वाचुन दाखविले त्यास सभासदांनी टाळयांच्या गजरात मंजुरी दिली।
तसेच सभासदांनी विचारलेले प्रश्न व धोरणात्मक सुचना व प्रश्नांचे वाचन करताना कारखान्याचे चेअरमन श्री।शिवानंद पाटील म्हणाले कि,३० वर्षाच्या समाजकारण व राजकारणाचे कालावधीत सर्व सहकाÅयाना समजुन घेवुन योग्य निर्णय घेत असलेने मला चेअरमन पदाची संधी दिली आहे। सर्वाना समान वागणुक देत असताना कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेत सर्व घटकांना सामावुन घेवुन काम केले आहे। दुजाभाव केला नाही व करणारही नसलेचे सुतोवाच केले। तसेच सभासदांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नावर शांततेने खुलासेवार उत्तरे देवून सभासदांचे शंका निरसन केले।
धनश्री परिवाराचे संस्थापक, मार्गदर्शक प्रा।शिवाजीराव काळुंगे मनोगतामध्ये म्हणाले, गेले तीन गळीत हंगाम या संचालक मंडळाने चांगल्या पध्द्तीने पार पाडले आहेत, त्यामुळे हे संचालक मंडळ अभिनंदनास पात्र आहे। कारखान्यामध्ये उत्पादन खर्च वाढल्याने व एफआरपी। मुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे। अशा परिस्थितीत स्पर्धेत टिकून गळीत हंगाम पार पाडावा लागणार आहे। यावर्षी पाऊस वेळेवर झाल्याने ऊसाची उपलब्धता असलेने दामाजी कारखान्याने जास्तीत जास्त ऊस गळीत करुन हंगाम यशस्वी करावा असे ते म्हणाले।
यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन अँड।श्री नंदकुमार पवार यांनी कारखाना चांगला चालविलेबध्द्ल संचालक मंडळाचे अभिनंदन करुन लवकरच सहप्रकल्प उभारणी करावा असे मत व्यक्त केले।
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, यांचेसह श्री अजित जगताप, चंद्रशेखर कोंडुभैरी, लतिफ तांबोळी, माजी संचालक मारुती वाकडे, महादेव फराटे, भारत पाटील तसेच शिवाजीराव नागणे, कल्याण रोकडे, शिवाजीराव पवार, रामेश्वर मासाळ, प्रविण खवतोडे,किसन सावंजी, सुनिल डोके, राजकुमार बिराजदार, बाबासो पडोळकर, शहाजी उन्हाळे, उत्तम घोडके, महादेव माळी, रमेश बेदरे, विठठल डोके, पांडुरंग हुलगे, पोपट पडवळे, आबासो पाटील, गडदे गुरुजी, सिध्द्ेश्वर मोरे, राजु बेदरे, लिंगाप्पा सोनगे, सिध्द्राम व्हनुटगी, बलभिम पाटील, सतिश आवताडे, नामदेव जानकर, दादा पवार, हिप्परकर सर, दत्तात्रय खडतरे, विजय बुरकूल, काशिनाथ पाटील, दामोदर घुले, एकनाथ फटे, मुरलीधर सरकळे, मनोज ठेंगील, अभिमान बेदरे, विठ्ठल चौगुले, राजेंद्र रणे, किरण क्षीरसागर, दत्तात्रय भाकरे, माधवानंद आकळे, जनार्धन डोरले, क्रांती दत्तू , भगरे सर, कारखान्याचे खातेप्रमुख ,कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते।
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अशेाक उन्हाळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संचालक श्री रेवणसिध्द् लिगाडे यांनी मानले। राष्ट्रगीताने सभेचे सांगता झाली
