दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांचा पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
(धनुभैया भोसले यांच्यासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे दक्षिण सोलापूरच्या राजकारणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे.
या वेळी सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जयकुमार माने, माजी नगरसेवक नागेश ताकमोगे, माजी नगरसेवक दादाराव ताकमोगे, सोलापूर बाजार समितीचे प्रथमेश पाटील, माने सहकारी बँकेचे संचालक आनंद देटे, काँग्रेसचे युवा अध्यक्ष पृथ्वीराज माने, साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय भोसले, नागनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. सतीश दरेकर तसेच सोलापूरचे उद्योजक श्रीकांत मेलगे-पाटील यांनीही भाजपात प्रवेश केला.
पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमास राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपाचे नेते कृपाशंकर सिंह यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात दक्षिण सोलापूरमध्ये भाजपाची ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.
