
जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसाठी आनंदाची बातमी या दिवशी निघणार आरक्षण सोडत?
*(जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा होणार या तारखेला हिरमोड)*
*(माळशिरस पंढरपूर मोहोळ माढा करमाळा उत्तर व दक्षिण सोलापूर अक्कलकोट बार्शी, सांगोला मंगळवेढा, या तालुक्यातील अनेक मातब्बर नेते मंडळींचे भविष्य या दिवशी ठरणार?)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
सोलापूर जिल्ह्यातील व प्रतीक्षेत अशा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका अखेर जाहीर होण्याच्या मार्गावर असून येत्या 13 तारखेला या निवडणुकी बाबत प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती गटातील आरक्षण सोडत निघणार असून याबाबत आजच महाराष्ट्र राज्य सरकारकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यानुसार दिवाळीच्या अगोदर पाच ते सहा दिवस आरक्षण सोडत निघणार असून खऱ्या निवडणुका ह्या दिवाळी झाल्यानंतर होणार आहेत. पण पण यामध्ये बहुतांश जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक मातब्ब नेते मंडळी व नेते मंडळींच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा नक्कीच या आरक्षण सोडतीनंतर हिरमोड होणार असल्याचे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे. ही आरक्षण सोडत म्हणजे अनेक मातब्बर नेते मंडळींना मोठा धक्का मानला जात असून यामुळे जवळजवळ आठ ते नऊ वर्षापासून तयारीत असलेल्या व जिल्हा परिषदेमध्ये चंचू प्रवेश करून पाहणाऱ्या अनेक मातब्बर जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी इच्छुक असणाऱ्या अनेक मातब्बर मंडळींसाठी हा मोठा धक्का असू शकतो..
जिल्हा परिषद निवडणूक यांची प्रक्रिया अखेर सुरू झाली असून राज्य निवडणूक आयोगाने एक ऑगस्ट 2025 रोजी पत्र काढून मुंबई शहर, मुंबई उपनगर, भंडारा आणि गोंदिया हे जिल्हे वगळून इतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आरक्षण सोडत काढण्यासाठी सूचित केले आहे.
यामुळे तब्बल साडेतीन वर्ष प्रतीक्षेत असलेल्या भावी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
दिनांक सहा ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर पर्यंत प्रारूप आरक्षण, हरकती, सूचना आणि अंतिम आरक्षण असा कार्यक्रम राहणार आहे. सोलापूर साठी आरक्षण सोडत ही १३ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत काढली जाणार आहे.
*कोट*
*१३ऑक्टोबर रोजी आम्ही आरक्षण सोडत जाहीर करणारा असून यासाठी संबंधित सर्व इच्छुक उमेदवारांनी प्रारूप आरक्षणाची अधूर्जना प्रसिद्ध केल्यानंतर दिनांक १४ ते १७ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये हरकती व सूचना दाखल करता येतील त्यानंतर या सदर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून आम्ही दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाणार आहेत याची सर्व इच्छुक सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी नोंद घ्यावी..*
कुमार आशीर्वाद
जिल्हाधिकारी सोलापूर
