
पूरग्रस्तांना तात्काळ दिलासा – राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पदाधिकाऱ्यांचा उपक्रम
(या तालुक्यातील आमच्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्या माध्यमातून चांगली मदत करणार:-आण्णासाहेब पाटील)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना पांडवाची पोफळी व साबळेवाडी येथील एका युवकाने व्हिडिओद्वारे पूरग्रस्त भागासाठी मदत मागितली. त्यानंतर अजितदादांनी तात्काळ सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. उमेशदादा पाटील यांना कॉन्फरन्सवर घेऊन आवश्यक ती मदत करण्यास सांगितले.
उमेशदादांनी काही क्षणांतच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व स्थानिक नेत्यांशी संपर्क साधला. त्यानुसार *मा. पैलवान नितीन निळे, कुरुलचे आण्णासाहेब पाटील, अॅड. विठोबा पुजारी, बेगमपूरचे युवा नेते मुजीबभाई चौधरी* यांच्यासह कार्यकर्त्यांची टीम पूरग्रस्तांकडे रवाना झाली.
पांडवांची पोफळी व साबळेवाडी गावापासून दीड किलोमीटर अंतर पायी चालून, पदाधिकाऱ्यांनी कुलदीप कांबळे वस्तीतल्या ५५ पूरग्रस्त कुटुंबांना गाठले. चिखल, पाणी व अडचणींवर मात करत त्यांनी खांद्यावर सामान वाहून नेले आणि तिथे खाद्यपदार्थ, पाणी, बिस्कीट, निवाऱ्यासाठी पाल यांची तात्काळ व्यवस्था केली.*
