आर्चिड काॅलेज येथे झालेल्या आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी करावी:- प्रियंका परांडे पाटील
(युवती शिवसेनेच्या वतीने प्रियांका पराडे-पाटिल यांनी दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन)
दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी आर्किड कॉलेज,सोलापूर-तुळजापूर रोड सोलापूर येथे एका विद्यार्थ्याने रोजी वसतीगृह येथे गळफास लावून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली.त्या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे युवासेना युवती राज्य कार्यकरणी सदस्य प्रियांका परांडे तसेच
युवासेना कॉलेज कक्ष जिल्हाप्रमुख अनिकेत राठोड ,आदित्य विटकर, विघ्नेश शिगराल , राहुल शेवाळकर, यशराज दंदाडे , अक्षय चव्हाण,अभिषेक कांदलगावकर या सर्व पदाधिकारी शिवसैनिक समवेत आर्किड कॉलेज ला भेट देऊन प्रिंसिपल आणि मैनेजमेंट शी चर्चा केली आणि त्वरित सोलापूर पोलिस अधीक्षक यांना या घटनेचा तपास चौकशी तात्काळ करण्यासाठी विनंती निवेदन दिले.
अशा घटना टळण्यासाठी विद्यार्थ्यांना मनोधैर्य वाढवण्यासाठी युवासेनाच्या वतीने प्रत्येक कॉलेज मधे विद्यार्थी मदत कक्ष तथा शिवसेना युवासेना च्या वतीने कमिटी स्थापन करण्याकरिता युवासेना युवतीसेना सोलापूर तयारी करत आहेत.
