पंढरपूर तालुक्यात चार पक्षांची संयुक्त विचार विनिमय बैठक!
(आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने या बैठकीला सर्व चारही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे:- दिलीप बापू धोत्रे)
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
काँग्रेस आय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या चारही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त विचार विनिमय बैठक रविवार, दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता करकंब येथील हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी, टेंभुर्णी रोड येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत मुंबईत 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर होणाऱ्या मोर्चाच्या नियोजनाबाबत तसेच आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा आणि रणनीती ठरविण्यात येणार आहे.
चारही पक्षांच्या पंढरपूर शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि अंगीकृत संघटनांचे नेते उपस्थित राहणार असून, एकत्रित लढा आणि समन्वय वाढविणे हा बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.बैठकीचे आमंत्रक पुढीलप्रमाणे –
मा. प्रा. सातलिंग शटगार – जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
मा. वसंत नाना देशमुख – जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)मा. संभाजीराजे शिंदे – जिल्हाप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)मा. दिलीप बापू धोत्रे – मनसे नेते स्थळ: हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी, करकंब दिनांक: 26 ऑक्टोबर 2025 (रविवार)वेळ: दुपारी 12.30 वाजताउपस्थित राहून बैठकीस यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

