*जागतिक महिला दिनानिमित्ताने रूपेश धोत्रे यांच्यावतीने नारीशक्ती सन्मान सोहळा संपन्न*
*(भाजपच्या सर्व नूतन नगरसेवकांचा केला या कार्यक्रमाप्रसंगी रूपेश मेंबरधोत्रे सन्मान)*
*(कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले सजना चित्रपटातील आकाश सर्वगोड व तृप्ती मोरे ही जोडगोळी)*
मोहोळ शहरातील सुप्रसिद्ध अशा मोहोळ नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष नगरसेवक रुपेश मेंबर धोत्रे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भव्य नारीशक्ती सन्मान सोळावं भाजपाच्या सर्व नूतन नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख उद्घाटक म्हणून सौ. राजश्री भाभी साहेब राजन पाटील, त्याचबरोबर मोहोळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे,मा. साईनाथ शौकत तलफदार, भारतीताई बरे, शाहिस्ता मुस्ताक शेख, आरती प्रशांत गाढवे, सरिता संतोष सुरवसे, श्रीमती स्वरांजली सावंत, श्रीमती मोनिका रणवरे, श्रीमती प्रियंका गोरे, प्रमोद बापू डोके, विद्यमान उपनगराध्यक्ष दत्तात्रेय खवळे, नगरसेवक सुशीलभैय्या क्षीरसागर, विक्रम फडतरे, अझरुद्दीन कुरेशी, याचबरोबर अनेक मोहोळ शहरातील व ग्रामीण भागातील मान्यवर या कार्यक्रमापासून उपस्थित होते..
या कार्यक्रमांमध्ये बहारदार असा नृत्यविष्कार पुणे येथील कलाकारांकडून सादर करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये सजना या मराठी चित्रपटातील प्रमुख आकर्षण अभिनेता आकाश सर्वगोड अभिनेत्री तृप्ती मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाप्रसंगी सौ. राजश्री(भाभीसाहेब) पाटील यांनी सर्व लहान मुलांना आकर्षक असे भेटवस्तू दिल्या..
जवळजवळ या कार्यक्रमांमध्ये उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ योजना ठेवण्यात आली होती यामध्ये जवळजवळ तीस पैठणी साड्या, ५ सोन्याच्या नथी, २० विविध प्रकारचे आकर्षक गिफ्ट, बक्षीस म्हणून या भागातील महिलांना देण्यात आले. या कार्यक्रमास मोहोळ शहरातील सर्व महिला वर्गांनी मोठ्या संख्येने यावेळी हजेरी लावली होती..
याप्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजक रुपेश मेंबर धोत्रे यांच्या सर्व मित्रपरिवार व सहकारी मोठ्या संख्येने या उपस्थित होते..
