*विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊसतोड कामगारांची दिवाळी झाली गोड!*
*मा. आमदार बबनदादा शिंदे व रणजीत भैय्या शिंदे यांच्याकडून ऊस तोडणी मजुरांना दीपावली भेट!*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बबन दादा शिंदे, व सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत भैय्या शिंदे यांनी दिवाळीच्या सणानिमित्याने येणाऱ्या सर्व ऊस तोडणी कामगारांसाठी दिवाळी भेट दिल्या आहे. यामध्ये त्यांनी ऊस तोडणी मजुरांना किराणा माल व फराळ किट दिले आहे. यामध्ये सर्व ऊस तोडणी कामगारांसाठी सर्व किराणा किट व फराळ गावोगावी कारखान्याच्या माध्यमातून पोहोच केलेले आहेत.. यामध्ये जवळजवळ ११५० मोठी वाहने ट्रॅक्टर,बजात ५५० व ४०० बैलगाडीच्या माध्यमातून सर्व वाटप करण्यात आले आहेत…
पटवर्धन कुरोली येथे सुद्धा कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ऊस तोडणी कामगारांना त्यांचे दिवाळी गोड व्हावी यासाठी हे सर्व साहित्य जागोजागी पोहोच केले आहेत.. यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर तालुक्यातील वाखरी भोसे व करकम गटांमध्ये हे सर्व फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले
यासाठी कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे जनरल मॅनेजर येलपले साहेब
मुख्य शेतकरी अधिकारी युनिट क्रमांक १ चे संभाजी थिटे साहेब , युनिट क्रमांक २ चे मुख्य शेती अधिकारी रामचंद्र पाटील”
करकंब युनिट २ चे शेती अधिकारी इंगवले याचबरोबर सर्व करकंब व भोसे गटातील सर्व ओव्हरशियर व चिटबाॅय यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी पटवर्धन कुरोली येथील नागेश उपासे, सोन्या नाईकनवरे, विजय मोरे, परसू पाटील, विष्णू मोरे अशोक नाईकनवरे उपस्थित होते.

