
*राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उत्तर सोलापूर तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप!*
*(जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरचे तालुकाध्यक्ष नंदकुमार गरड यांनी केले वाटप)*
सीना नदीला आलेल्या महाभयंकर महापुरामुळे सर्व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.. या नुकसानीची भरपाई न होण्यासारखी असून कोट्यावधी रुपयांची मालमत्ता व शेतजमिनींचे नुकसान यामुळे झाले आहे. याच अनुषंगाने सामाजिक जाणिवेतून तयार झालेली हाक म्हणजेच सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सर्व उत्तर सोलापूर तालुक्यातील विशेषता शिवणी, पाकणी, ति-हे, या गावातील सर्व पूरग्रस्त नागरिकांना व बाधित कुटुंबीयांना उत्तर सोलापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष नंदकुमार गरड साहेब यांच्या माध्यमातून या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.. सामाजिक जाणिवेतून या गोष्टी होत असून. नंदकुमार गरड साहेब यांचे सर्व तेथील ग्रामस्थांनी या वाटपाबाबत आभार मानले आहेत.
या सर्व वाटपाच्या वेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष मयूर गोरे, उपाध्यक्ष प्रवीण चाफाकरंडे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सचिन जांभळे प्रशांत गरड, समाधान गवळी, किशोर खरात, आधी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व जिल्हाध्यक्ष उमेश दादा पाटील यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
