मोहोळच्या उपनगराध्यक्षपदी कुंदन धोत्रे हेच प्रबळ दावेदार!
(४० वर्षे केलेल्या कामाचे व व निष्ठेचे फळ नगरसेवक कुंदन धोत्रे यांना अखेर मिळणार)
(मोहोळ शहरातील सर्व प्रभागांची व शहराची संपूर्ण माहिती असणारे कुंदन धोत्रे हेच होऊ शकतात उपनगराध्यक्ष?)
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
मोहोळ नगरपरिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून निर्विवादपणे निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक रुपेश उर्फ कुंदन हिरालाल धोत्रे हे आगामी होणाऱ्या मोहोळ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी निवडीसाठी प्रबळ दावेदार असून, त्यांनी केलेल्या आजपर्यंत विकास कामांच्या व सामाजिक बांधिलकीच्या जोरावर ते मोहोळ नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात..
चाळीस वर्षं अधिक काळ ते माजी आमदार राजन मालक पाटील, विक्रांत उर्फ बाळराजे पाटील, माजी आमदार यशवंत तात्या माने यांच्या मर्जीतील असून त्याने अनेक व विविध विकासकामे आपल्या प्रभागाबरोबरच मोहोळ शहरांमध्ये ही केली असून त्यांचा एकंदरीत अनुभव पाहता त्यांना उपनगराध्यक्ष पद मिळू शकते..अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
मोहोळ शहरातील प्रभागाबरोबरच संपूर्ण शहराची इत्यभूत माहिती असणारे नगरसेवक म्हणून, त्यांच्याकडे पाहिले जात असून नगरसेवक कुंदन धोत्रे उपनगराध्यक्ष झाले तर, शहराच्या विकासाला मोठी चालना त्या माध्यमातून मिळणार आहे त्याचबरोबर अंडरड्रेनेज लाईन, दररोज मिळणारे पाणी व शहरातील सर्व विजेच्या समस्या यामुळे लवकरात लवकर सुटण्यासाठी सुद्धा मोठे प्राधान्य मिळणार आहे…
