
आरोग्याची वारी पंढरीच्या दारी यामाध्यमातून लाखो भाविकभक्त लाभ घेणार!
(डोक्याच्या केसापासून ते पायाला नकापर्यंत भाविकभक्तांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार)
(दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीनिमित्त महा आरोग्य शिबिराचे भव्य दिव्य आयोजन)
आषाढी यात्रेकरिता दिंड्या पालख्या सोहळ्या बरोबरच लाखोच्या संख्येने भाविकभक्त वारकरी येत असतात या होणाऱ्या मोठ्या गर्दीमध्ये भाविकांचे आरोग्य बिघडू नये यासाठी भाविकभक्तांचे आरोग्य चांगले राहीले पाहिजे यासाठी ही वारी आरोग्यदायी ठरणार आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने आषाढी वारीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या आषाढी वारीला येणाऱ्या पालखी व दिंडीतील सर्व भाविकभक्तांना प्रस्थानापासून आरोग्यसेवा देण्यात येणार आहे. तर पंढरीत येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकभक्तांच्या आरोग्य तपासणीसाठी मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे.
याकरिता आरोग्य विभागाने नवी संकल्पना आणत “आरोग्याची वारी पंढरीच्या दारी” या नव्या संकल्पनेवर आधारित वारी कालावधीत प्रत्येक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
हे महाआरोग्य शिबिर दिनांक 15, 16, 17,18 जुलै या तारखेला वाखरी, गोपाळपूर, तीन रस्ता, 65 एकर या परिसरात महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांनी दिले आह.
या शिबिरामध्ये भावी भक्तांची आरोग्य तपासणी, डोळ्याची तपासणी, हृदयरोग तपासणी, रक्ताक्षय तपासणी, औषध वितरण, घसा तपासणी, हाडांचे तपासणी, दंत तपासणी, चष्म्याचे वितरण, येशील सिकलसेल तपासणी अशा अनेक अत्याधुनिक तपासण्या मोफत करण्यात येणार आहे.
आषाढी एकादशी हा मुख्य सोहळा दिवशी दिनांक 17 जुलै रोजी साजरा होणार आहे या सोहळ्याकरिता माऊली तुकोबाराय यांच्यासह असंख्य पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. या पालख्या दिंड्या पंढरपूरला येत आहेत पंढरीत किमान 15 ते 18 लाख भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच अनुषंगाने भाविकांच्या आरोग्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.
यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथके कार्यरत करण्यात आले आहेत तसेच पालखी सोहळा प्रस्थानापासून वारकरी भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य सर्व यंत्रणा कार्यरत केले आहेत.
राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यावर विशेष लक्ष ठेवून आहेत संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासह मानाच्या पालखी सोहळ्या बरोबरच येणाऱ्या वारकरी भाविकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आरोग्य विभागाकडून मुबलक औषध पुरवठा करण्यात येणार आहे केवळ औषध साठास न करता भाविकांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी करण्यात येणार आहे तसेच पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या दिंड्यांना सामाजिक संस्था व्यक्ती दिंडीतील वारकरी भाविकांना अन्नदान व फळ वाटप करून सेवा करण्याचा प्रयत्न करतात वाटप करण्यात येणाऱ्या अन्नाची व फळांची तपासणी देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे.
या महाआरोग्य शिबिराची जयत तयारी करताना दिसून येते आहे यावेळी भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महावीर नाना देशमुख, शहर प्रमुख मुन्ना भोसले, श्याम गोगाव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.