
महाराष्ट्र राज्य उद्योजक बिझनेस आयकॉन ऑफ द इयर या पुरस्काराने मनसेनेते दिलीप बापू धोत्रे यांचा सन्मान.
(सिने अभिनेत्री वर्षाताई उसगावकर यांच्या शुभहस्ते दिलीप बापूंचा सन्मान)
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
पुणे येथील काकडे पॅलेस या सभागृहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांना ‘बिझनेस आयकॉन ऑफ द इअर’ महाराष्ट्र राज्य उद्योजक गौरव पुरस्काराने जेष्ठ सिने अभिनेत्री वर्षाताई उसगांवकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना वर्षाताई उसगावकर म्हणाल्या की अतिशय कष्टाने आणि जिद्दीने दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर येथे पंचतारांकित हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी, हॉटेल श्रीयश, पुणे येथे हॉटेल साक्षी, पंढरपूर येथे हिंदुस्तान ट्रॅक्टरचे ग्रँड ट्रॅक्टरची डीलरशिप, हिंदुस्तान पेट्रोलियम चे पेट्रोल पंप, विठाई अर्बन निधी बँक, डीडी इन्फ्रा, डीडी कन्स्ट्रक्शन, मनसे ॲग्रो इंडस्ट्रीज या विविध व्यवसायाची निर्मिती केली असून शेकडो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. अतिशय गरीब कुटुंबातून येऊन दिलीप धोत्रे यांनी स्वतःच्या कष्टाने आणि ताकदीवर वेगवेगळे व्यवसाय सुरू केले त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते असे हे गौरव उदगार वर्षाताई उसगावकर यांनी यावेळी काढले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
