
काँग्रेस नेते भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा
८५ वा वाढदिवस पंढरीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे यांच्याकडून
यानिमित्ताने वृद्ध बांधवांना भोजनाचा आस्वाद देण्यात आला.
बुधवार दि.३ सप्टेंबर रोजी , गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात हा उपक्रम पार पडला.
याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
सातलिंग शटगार , जिल्हा उपाध्यक्ष
अर्जुन पाटील आणि पंढरपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत मोरे
यांची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचा
८५ वा वाढदिवस सबंध जिल्ह्यात
उत्साहाने साजरा केला जात आहे. यानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीकडूनही
हा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांच्या
अध्यक्षतेखाली आणि काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन पाटील यांच्या शुभहस्ते , वृद्ध बांधवांना
भोजनाचा आस्वाद देण्यात आला. याप्रसंगी गोपाळपूर येथील वृद्धाश्रम परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.
पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंत मोरे हे मुळातच समाजसेवक असल्याने, त्यांच्याकडून नेहमीच सामाजिक उपक्रम राबवले जातात. दरवर्षी
ना. सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.
यावर्षी वृक्षारोपण आणि वृद्ध बांधवांना भोजन देऊन त्यांनी
समाज बांधवांपुढे मोठा आदर्श ठेवला आहे. गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात येथील वृद्ध बांधवांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष
मोतीराम चव्हाण, मोहोळ तालुक्यातील सुरेश शिवपूजे, सुरेश पवार, ओबीसी मा. जिल्हाध्यक्ष समीर कोळी, जिल्हा उपाध्यक्ष सुहास भाळवणकर, नागनाथ अधटराव, मिलिंद अढवळकर, देवानंद इरकल, शेखर मोरे, बाळासाहेब आसबे, बाळासाहेब जाधव, हनुमंत नाईकनवरे, पिंटू अडगळे, दत्तात्रय बडवे, शंकर गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
