
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत,शिवसेना-भाजप-आरपीआय युती कायम : — मा.आ. शहाजीबापू पाटील
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी:
मा. आम. शहाजीबापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप आणि आरपीआय या तिन्ही पक्षांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता ही बैठक मा. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयात सांगोला येथे संपन्न झाली. या बैठकीत तिन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसंदर्भात सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. यावेळी माजी आम. शहाजीबापू पाटील, ॲड. उदयबापू घोंगडे, माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, शिवसेना महिला तालुकाध्यक्षा व माजी नगराध्यक्षा राणीताई माने, विधानसभा प्रमुख व माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख, माजी नगरसेवक अस्मिर तांबळी, शिवसेना शहराध्यक्ष व माजी नगरसेवक माऊली तेली यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.या यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांची युती कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनात मा.आ. शहाजीबापू पाटील म्हणाले की, “येणारी निवडणूक आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने लढवायची आहे. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आजपासून कामाला लागावे. नगरपालिकेवर शिवसेना-भाजप-आरपीआय या तिन्ही पक्षांचा झेंडा फडकला पाहिजे, हेच आपले लक्ष्य असले पाहिजे.“आमची युती कायम असून आणखी कोणता पक्ष या युतीमध्ये सहभागी होऊ इच्छित असेल, तर आम्ही त्यांचे स्वागत करू. आम्हाला सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. असेही शहाजीबापू पाटील यांनी नमूद केले.
यावेळी शिवसेना महिला तालुकाध्यक्ष राणीताई माने म्हणाल्या, माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही पक्षांचे पदाधिकाऱी, मान्यवर व कार्यकर्ते यांना सोबत घेऊन नगरपालिकेवर नगराध्यक्षा सह बहुमताने सत्ता आणू. त्यादृष्टीने सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन केले.
या संयुक्त बैठकीत तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत संघटीतपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवसेना, भाजप व आरपीआय या तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने बैठकीला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, व आरपीआय या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी मार्गदर्शक ॲड.उदयबापू घोंगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत ,माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, शिवसेना महिला तालुकाध्यक्षा व माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने, तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे, विधानसभा प्रमुख माजी नगरसेवक प्रा. संजय देशमुख, शहराध्यक्ष व माजी नगरसेवक माऊली तेली, आरपीआय जिल्हा सचिव सतीश काटे, आरपीआयचे सौदागर सावंत, युवा शहराध्यक्ष समीर पाटील, गटनेते, माजी नगरसेवक आनंदाभाऊ माने ,शिवसेना युवा जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील, माजी नगरसेवक सतीशभाऊ सावंत, माजी नगरसेवक सोमेश यावलकर, कीर्तीपाल बनसोडे, माजी नगरसेवक अस्मिर तांबोळी, माजी नगरसेविका छायाताई मेटकरी, शोभाताई देशमुख, रुकसाना मुजावर, मनीषा लिगाडे, सुवर्णा तेली, आरती देशमुख, अच्युत फुले, आनंद दौंडे, फिरोज खतीब, आनंद फाटे, सुजित भोकरे ,सचिन सादिगले, प्रभाकर घोंगडे, सूर्यकांत मेटकरी, प्रसाद कुलकर्णी, काशिलिंग सरगर, चैतन्य राऊत, अशपाक तांबोळी, यांच्यासह शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आर. पी .आय. या पक्षाचे पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.
कोट
ठराव-शिवसेनेच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी साठी युती, आघाडी व उमेदवारी बाबतचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना देण्याचा ठराव माजी नगरसेवक व विधानसभा प्रमुख प्रा. संजय देशमुख यांनी मांडला व या ठरावाला शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लवटे यांनी अनुमोदन दिले. या ठरावाबाबत उपस्थित पदाधिकारी, मान्यवरांनी हात उंचावून ठरावाचे स्वागत केले*.
