
खासदार उदयनराजे भोसले यांची भिमानगर येथील संजय पाटील- भिमा-नगरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट!
(खासदार उदयन महाराज भोसले रणजीत भैय्या शिंदे व संजय पाटील भिमानगरकर यांच्यात झाली गुप्त चर्चा)
सातारा जिल्ह्याचे खासदार माननीय उदयन महाराज भोसले हे काल सोलापूर येथील एका कार्यक्रमानिमित्त आल्या असता त्यांनी माढा तालुक्यातील माजी आमदार बबनदादा शिंदे समर्थक ज्येष्ठ नेते संजय पाटील भिमा नगरकर यांच्या फार्म हाऊसवर सदिच्छा भेट दिली! यावेळी त्यांच्या समवेत सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीत भैया शिंदे हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी खासदार उदयन महाराज भोसले, यांचा यथोचित सन्मान करण्यात आला! यावेळी अनेक विषयांवर याप्रसंगी चर्चा करण्यात आली.
यावेळी कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती संजय दादा पाटील , प्रा. सुहास पाटील , चंदकांत बागल, वेताळ आण्णा जाधव, रमेश पाटील, नितीन मस्के, दिपक मामा पाटील, पांडूरंग माने, वसंत चौगुले, डॉ. विनोद चव्हाण, नेताजी चमरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.