
*खैराव विकासापासून वंचित ठेवणार नाही* – आमदार अभिजीत पाटील
*राजकारण बाजूला ठेवून खैराव गावचा विकास करूया*- आमदार अभिजीत पाटील
*(खैराव येथे व्यायामशाळा उभारणीचे भूमिपूजन आमदार पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न)*
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या स्थानिक विकास निधी २०२४-२५ तून माढा तालुक्यातील खैराव येथे ग्रामपंचायत जागेत व्यायामशाळा उभारणीसाठी एकूण रु. १०लक्ष रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी सरपंच जानकाबाई मस्के, माजी सरपंच विलासराव देशमुख, ग्रामपंचायत सदस्य समाधान नागटिळक, वैभव पाटील, ज्ञानेश्वर सुतार, जयसिंह देशमुख, महादेव शेळके, संजय शेळके, बी. आर. पाटील, विजय नागटिळक, किशोर कदम, ब्रह्मदेव शेळके, अर्जुन शिरसागर, कल्याण चव्हाण, अरुण सुतार, गणेश नागटिळक, किरण नागटिळक, आण्णा सरवदे, खंडेराव नागटिळक, कुलदीप नागटिळक, कृष्णा शिरसागर, योगेश पांढरे, कृष्णराज देशमुख, दीपक देशमुख, योगेश रणपिसे, सोमनाथ शिंगाडे, राहुल नागटिळक, संदिपान नागणे, नितीन नागणे, अशोक शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच जानकाबाई मस्के यांच्या हस्ते आमदार अभिजीत आबा पाटील यांचा समस्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
राजकारण बाजूला ठेवून खैराव गावचा विकास करूया. सेवा पंधरवड्याच्या कालावधीमध्ये १७सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबरपर्यंत गावच्या विकास तसेच गावचे अडीअडचणी गट बाजूला ठेवून सोडवाव्यात, जिथे लागेल तिथे मी आपल्या सोबत असेल अशी ग्वाही आमदार पाटील यांनी आपल्या भाषणातून दिली. तसेच ग्रामस्थांच्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी तसेच युवकांना खेळ, क्रीडा व व्यायामाची आधुनिक सोय उपलब्ध करून देण्यासाठी ही व्यायामशाळा उभारली जाणार आहे. ग्रामविकासासाठी नेहमीच सकारात्मक पाठबळ देण्याची ग्वाही देत ग्रामस्थांशी संवाद साधला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
