
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या परंपरेप्रमाणे पोळा सणासाठी प्रती मे.टन रु.७५/- प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग
(स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांची परंपरा आजही जतन)
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या परंपरेप्रमाणे पोळा सणासाठी गळीत हंगाम २०२४-२५मध्ये गाळप झालेल्या ऊसास प्रति मे.टन रु. ७५/- प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले आहे. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांनी घालुन दिलेली परंपरा आजही कारखाना व्यावस्थापन जतन करीत असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी दिली. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री.कैलास खुळे, संचालक व कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी माहिती दिली की, कारखाना स्थापनेपासून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना पोळा सणासाठी पैशाची गरज असल्याने ऊस बिल दिले जात होते. तीच परंपरा व्यवस्थापन आजही जतन करीत असून शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या पोळा सणाला ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. ती गरज ओळखून प्रति मे. टन रु.७५/- प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांमधून आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याची जिल्ह्यात मागील सुमारे १५ वर्षापासून सर्वोत्कृष्ठ ऊस दर देण्याची परंपरा असून नेहमीप्रमाणे पोळा सणासाठी कारखान्याने ऊस बिल देणेची परंपरा जपलेली आहे. त्यास अनुसरुन ऊस बिल अदा केले आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यांने गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप केलेल्या ऊसास आज पर्यंत प्रति मे. टन रू २७००/- प्रमाणे रक्कम अदा केली आहे. त्याचप्रमाणे पोळा सणासाठी प्रति मे. टन रुपये ७५/- प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत २७७५/- प्रमाणे प्रति मे. टन ऊस बिल मिळाले असून कारखान्याने ऊस उत्पादकांना एफ. आर. पी. पेक्षाही ज्यादा रक्कम अदा केली आहे.
गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कारखान्याकडे सुमारे १५,००० हेक्टर ऊस क्षेत्राच्या ऊस नोंदी असून त्यामधून सुमारे १२ ते १४ लाख मे.टनापर्यंत ऊस उपलब्ध होऊन या सर्व ऊसाचे गाळप वेळेवर करण्याचा कारखाना व्यावस्थापनाचा मानस आहे. त्यासाठी कारखान्याने ऑफ सिझन मधील सर्व कामे पुर्ण केलेली आहेत.
यावेळी कारखान्याचे संचालक श्री.दिनकरराव मोरे, श्री.उमेशराव परिचारक, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री.बाळासाहेब यलमर, श्री.भगवान चौगुले, श्री.लक्ष्मण धनवडे श्री.भास्कर कसगावडे, श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.सुदाम मोरे, श्री.विजय जाधव, श्री.हनुमंत कदम, श्री.किसन सरवदे, श्री.दाजी पाटील, श्री.दिलीप गुरव, श्री.सिताराम शिंदे, श्री.शामराव साळुंखे, श्री.राणू पाटील आदी व कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.