कर्मयोगी इन्स्टिटयूटमध्ये ७६ वा. प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न.
२६ जानेवारी २०२५ रोजी कर्मयोगी इन्स्टिटयूटऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय शेळवे येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. एस पी पाटील यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्व विषद केले. तसेच हा दिवस म्हणजे स्वतंत्र भारतासाठी बलिदान देणाऱ्या सर्वांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य आहेत आणी म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपली जबाबदारी ओळखून भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे असे सांगून त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य प्रा.गुरुराज कुलकर्णी,फार्मसी कॉलेज चे प्राचार्य प्रा. एस एम जाधव, ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्या प्रा. एम आर शिंदे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके तसेच डिग्री अभियांत्रिकी,पॉलिटेक्निक, नर्सिंग, फार्मसी, ज्युनिअर कॉलेज चे सर्व विद्यार्थी, विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.