उद्योगपती भावी आमदार राजू खरेंनी बनविला स्वखर्चातून रस्ता
(खा. धनंजय महाडिक यांच्या पुळुज गावी रस्ता झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण)
(सरपंच विश्वास भैया महाडिक यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याचे काम लागले मार्गी)
लोकप्रतिनिधीकडे वेळोवेळी मागणी करूनही निधी उपलब्ध होत नसल्याने पंढरपूर तालुक्यातील पुळुज याठिकाणी कारंडे वस्ती ते वाघमोडे वस्ती दरम्यान असणारा रस्ता दुर्लक्षीत राहिल्याने याबाबत येथील रहिवाशांनी ४० वर्ष खस्ता खाल्ल्या अखेर मोहोळ विधनसभा मतदार संघात ईच्छुक असणारे संभाव्य उमेदवार उद्योजक राजाभाऊ खरे यांचेकडे याबाबत गार्हाणे मांडल्यानंतर त्यांनी स्वखर्चातून हा रस्ता गावचे सरपंच विश्वास महाडिक यांचे पुढाकारातुन बनविण्यास सुरुवात केल्याने रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
पंढरपूर तालुक्यातील पुळुज या गावात कारंडे वस्ती ते वाघमोडे वस्तीसाठी रस्ता व्हावा याकरीता गेली 40 वर्ष नागरिक पुढाऱ्याकडे मंत्र्याकडे हेलपाटे घालुन साकडे घालत होते परंतु तेथील नागरीकाच्या समस्या कोणीही जाणली नाही आणि रस्ताही झाला नाही. पावसाळ्यात रस्त्या अभावी कच्च्या रस्त्याने चिखलातून पाण्यातून वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना विद्यालयात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत होता.
पावसाळ्यात रस्त्यावर चिखल राहिल्यास ग्रामस्थांना बाहेरगावी जाण्यासाठी व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जाण्यासाठी वस्तीतून बाहेर पडता येत नव्हते. याबाबत येथील नागरिकांची कोणीही दखल घेतली नाही. या रोडवर थोडा जरी पाऊस पडला तरी नागरिकांना जाता येत नाही. या भागात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात होत आहे. येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे काही मुलांची लग्नं सुद्धा मोडली आहेत. याबाबत वस्तीवरील नागरिक सरपंच विश्वास महाडिक यांच्याकडे गेले. आम्हाला रोड करून द्या. त्यांनी लगेच सांगितले. उद्योजक राजू खरे, यांच्याकडे सर्वजण जावा आणि त्यांना भेटा. सर्व नागरिक उद्योजक राजू खरे यांना भेटले व त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता. लगेचच मुरमीकरण कामास स्वखर्चाने सुरुवात केली. अनेक पिढ्यांपासून असलेली शेतीची व स्वत:ची फरपट इतिहासजमा केली.मुळातच बागायती, सुपीक जमीन पावसामुळे चिखलमय होत असे. चालत जाणेही अशक्य असताना वाहने कशी जाणार? त्यामुळे गेली कित्येक वर्षे या परिसरातील शेतमाल शेतकऱ्यांच्या घरी पोहोचताना नाकीनऊ होत होते. पावसाळ्यात कित्येक वेळा पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान शेतकरी सहन करत होते. स्वतःच्या खिशातून भरीव आर्थिक मदत राजू खरे, यांनी केली आहे. वाघमोडे वस्ती च्या रोडच्य कामास दिमाखात सुरुवात झाल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. सरपंच विश्वास महाडिक उपसरपंच असिफ शेख यांनी स्वतः उपस्थित राहून कामाची देखरेख केली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.