अनिलदादा सावंत यांच्याकडून पंढरपूर व मंगळवेढ्यात चार ठिकाणी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन
महाविकास आघाडीकडुन अनिलदादा सावंत पंढरपूर-मंगळवेढयांत इच्छुक
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत यांचेकडून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील महिला-भगिनींसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
एकुण चार ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज गुरुवार दि.२६ रोजी दुपारी ठीक दोन वा. दाते मंगल कार्यालय सांगोला रोड पंढरपूर येथे पहिल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानंतर शनिवार दि. २८ रोजी मारोळी (ता. मंगळवेढा) येथे श्री संत बागडेबाबा आश्रम येथे होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार १ ऑक्टोंबर रोजी दुपारी दोन वाजता श्रीराम मंगल कार्यालय इसबावी (ता.पंढरपूर) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शनिवार दि. ५ ऑक्टोंबर रोजी मल्लिकार्जुन मंगल कार्यालय सिद्धापूर (ता.मंगळवेढा) येथे दुपारी ठीक दोन वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिने अभिनेत्री पूजा काळभोर या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असणार आहेत. गप्पा, गोष्टी, मनोरंजन खेळ, गाणी, स्टॅन्डअप कॉमेडी, लावणी याशिवाय या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी वेगवेगळी बक्षीस ठेवण्यात आली आहेत.
तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला साडीचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय सकाळी 11 ते दुपारी एक वाजेपर्यंत स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यामुळे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अनिलदादा सावंत मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे