
घरकुलाचे काम कमी असणाऱ्या मोहोळ तालुक्यातील ५ ग्रामपंचायत अधिकारी यांना कारवाई करण्याची बजावली नोटीस*
*मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम ऍक्शन मोडवर…
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत आज मोहोळ पंचायत समितीमध्ये आढावा बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी घरकुलाचे काम कमी असणाऱ्या व हलगर्जीपणा करणाऱ्या २० ग्रामपंचायत चा आढावा घेतला तर ५ ग्रामपंचायत अधिकारी यांच्या वर शिस्तभंग कारवाई करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम हे घरकुल कामामध्ये ऍक्शन मोडमवर आले आहेत.
मोहोळ पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आज मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आज प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी व शाखा अभियंता यांची आढावा बैठकी घेऊन अडीअडचणीबाबत मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, गट विकास अधिकारी विवेक जमदाडे, सहाय्यक गट विकास अधिकारी व्ही.आर.देशमुख, विस्तार अधिकारी नागसेन कांबळे, सचिन कदम, एस.आर.ठक्का आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत ज्या तालुक्यात काम कमी आहे असे तालुका व ग्रामपंचायत यांची मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी जिल्हा व तालुका स्तरावर आढावा घेऊन बैठक घेऊन घरकुल कामास गती दिली आहे.यापूर्वी घरकुलाचे काम कमी असणाऱ्या २ ग्रामपंचायत अधिकारी यांच्या कारवाई करण्यात आली आहे.आज मोहोळ पंचायत समिती येथे आढावा बैठक घेऊन मोहोळ तालुक्यात घरकुलाचे काम कमी असलेल्या २० ग्रामसेवकांना धारेवर धरले.अजून पंधरा दिवसांनी घरकुल योजनेची पुन्हा बैठक घेण्यात येणार असून कामात सुधार न करणाऱ्या ग्रामसेवकांना कारवाईचा इशारा दिला आहे आणि लाभार्थ्यास कुठल्याही स्तरावर त्रास व अडवणूक होणार नाही याची काळजी घेण्याच्या सक्त सूचनाही दिल्या आहेत.येत्या आठवड्यात सर्वच तालुका निहाय बैठका घेण्यात येणार आहेत.
——
मोहोळ तालुक्यातील पेनूर व पाटकुल या दोन ग्रामपंचायतीना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घरकुल कामाच्या प्रगतीची पाहणी केली.
—-
*या २० ग्रामपंचायतचे उद्दिष्ट जास्त शिल्लक*
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत टप्पा २ मधील सन २०२४- २५ मध्ये असमाधानकारक कामकाजबाबत मोहोळ तालुक्यातील शेटफळ, पोपळी, कोळेगाव, कुरुल,पाटकुल, वाफळे, नरखेड, स.वरवडे, देगाव (वा.), साळवेश्वर, आष्टी, पेनूर, औंढी वाळूज, आष्टी, बाभुळगाव, म.चौधरी, गोटेवाडी, कोरवली, अंकोली या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी यांना कामात सुधार करण्याच्या सूचना दिल्या.घरकुलचे २० टक्केच काम सुरू असल्याने व्यक्त केली नाराजी व्यक्त केली.यापूर्वी जिल्ह्याला मीटिंग घेत दोन ग्रामसेवक निलंबित करून काही ग्रामसेवकांच्या वेतन वाढ थांबवल्या आहेत.स्वतः लाभार्थ्यांची भेट घेत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनाही यातून लाभार्थी भेटी घेण्याचा संदेश दिला.या महत्वकांक्षी योजनेत सोलापूर जिल्हा मागे राहणार नाही यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे बाह्या सरसवल्या आहेत.
