
घडीत 5 चा ठोका वाजला अन् माजी मंत्र्यांच्या मुलाला उचललं?
तानाजी सावंतांच्या सुपुत्राचं अपहरण नेमकं कसं झालं?
संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणारी देणारी घटना समोर आली आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाले आहे. एका राजकीय नेत्याच्या सुपुत्राचेच अपहरण झाल्याचे समोर आल्यानतंर आता एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातून एका स्वीफ्ट कारच्या मदतीने हे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता अपहरणाचा हा प्रकार समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. तानाजी सावंत यांच्या मुलाचा म्हणजेच ऋषीराज सावंत यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.
नेमकं अपहरण कसं झालं?
तानाजी सावंत यांचे सुपुत्र ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाले आहे. या अपहरणाबाबत सध्यातरी सविस्तर माहिती समोर आलेली नाही. मात्र दाखल तक्रारीनुसार माजी आरोग्यमंत्र्याच्या मुलाचे पुण्यातून अपहरण विमानतळावरून अपहरण झाल्याची माहिती मिळत आहे. आज संध्याकाळी 4.57 वाजता हे अपहरण झाले आहे. अपहरणासाठी आरोपींनी स्विफ्ट कारचा वापर केल्याचे समोर आले आहे. आता उपलब्ध माहितीनुसार या पोलीस आरोपी तसेच तानाजी सावंत यांचे सुपुत्र ऋषीराज सावंत यांचा शोध घेत आहेत. ऋषीराज कुठे आहेत, याची माहिती पोलिसांना अद्याप! मिळालेली नाही.
पुणे पोलीस ॲक्टिव्ह मोडमध्ये?
तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाचे प्रकरण समोर आल्यानंतर आता पुण्यातील पोलीस सक्रीय झाले आहेत. पोलिसांकडून ऋषीराज सावंत यांचा कसून शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. सोबतच पुण्यातील विमानतळ! परिसरातही नाकाबंदी करण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट कारूमधून झालेल्या या अपहरण प्रकरणात आरोपी कोण आहे, याचाही पोलीस कसून शोध घेत आहेत.