
गळीत हंगाम 2025-26 साठी युटोपियन शुगर्स चे मील रोलर पुजन संपन्न – उमेश परिचारक
कचरेवाडी ता. मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याचे गाळप हंगाम 2025-26 साठी मील रोलर पुजन गुरुवार दि. 07/08/2025 रोजी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना चेअरमन श्री उमेश परिचारक म्हणाले की, आपल्या कारखान्याचा हा बारावा गळीत हंगाम असून मागील 11 ही हंगामात युटोपियन ने भरीव कामगिरी केलेली आहे. चालू गळीत हंगामात 6.00 लाख मे.टन ऊसाचे गाळप करणेचे उद्दिष्ट आहे. चालू गळीत हंगामात ऊसाची उपलब्धता चांगली आहे. यंदा पाऊस चांगला पडला असल्यामुळे ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ऊस उत्पादकांनी आजपर्यंत ठेवलेल्या विश्वासास पात्र राहुन या गळीत हंगामात कारखान्याचे मार्गदर्शक आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या सुचने नुसार सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा व मोहोळ या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप केला जाईल.
चालु गळीत हंगामात सर्व कामगारांच्या वतीने कारखान्याचे चिफ टेक्निकल ऑफीसर तुकाराम देवकते यांनी झिरो स्टॉपेज व झिरो लिकेज ही टॅगलाई तयार करुन त्यानुसार काम करणार असलेचे सांगीतले.
सदर प्रसंगी चेअरमन उमेश परिचारक व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार कल्याण अधिकारी रविराज पाटील यांनी व आभार ई.डी.पी मॅनेजर अभिजीत यादव यांनी मानले.
फोटो ओळी:- युटोपियन शुगर्स लि. या कारखान्याचा गळीत हंगाम 2025-26 करिता आयोजित मील रोलर पुजन कार्यक्रमा प्रसंगी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक समवेत कारखान्याचे सर्व खाते-प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात दिसत आहे.